नेपियर: न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. आता तिसरा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा हार्दिक पंड्याच्या टीमचा प्रयत्न असेल. दुसऱ्या मॅचमधील विजेता संघ कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे. जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध टी 20 सीरीज होणार आहे. त्याआधी बेंच स्ट्रेथची चाचणी घेण्याची ही शेवटची संधी आहे.
त्याला बेंचवरच बसावं लागेल
ऋषभ पंत टी 20 क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरतोय, तरीही टीम मॅनेजमेंट तिसऱ्या मॅचसाठी त्याच्यावर विश्वास दाखवेल. सूर्यकुमार यादवचा तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जाईल. ऋषभ पंत इन टीम खेळला, तर संजू सॅमसनला बेंचवरच बसून रहावं लागेल. वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारच्याजागी उमरान मलिक एक दावेदार आहे.
ऋषभकडे चांगली संधी
नियमित कॅप्टन रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या तिघांना चालू सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ऋषभ पंतला टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. ऋषभचाच स्पर्धक संजू सॅमसनला अंतिम 11 मध्ये खेळण्यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागेल.
न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने भविष्याच्या दृष्टीने संघबांधणीकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंकडे उत्तम प्रदर्शन करण्याची एक चांगली संधी आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 – हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार/उमरान मलिक, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल,