वेलिंग्टन: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये होणारा पहिला टी 20 सामना आज पावसामुळे रद्द झाला. वेलिंग्टनमध्ये सामना होणार होता. पण सामन्याच्यावेळी पाऊस सुरु झाला. पाऊस थांबण्याची लक्षणे दिसत नसल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला. खरंतर हा क्रिकेटचा सामना होता. पण पावसामुळे भारत-न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आपसात फुटबॉल मॅच खेळण्याचा आनंद घेतला. क्रिकेटच्या भाषेत या खेळाला फुटी म्हणतात.
शुभमन गिल आपल्याच मूडमध्ये
न्यूझीलंडकडून केन विलयम्सन-डेवन कॉनवे तर भारताकडून संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा खेळताना दिसले. टीमशी संबंधित अन्य लोक यावेळी प्रेक्षकांच्या भूमिकेत होते. यावेळी शुभमन गिलचा एक वेगळा अंदाज पहायला मिळाला. भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू आपलं फुटबॉल कौशल्य दाखवत होते. त्यावेळी टी 20I मध्ये डेब्युची वाट पाहणाऱ्या शुभमन गिलची आपली मजा-मस्ती सुरु होती.
#TeamIndia and New Zealand team enjoy a game of footvolley as we wait for the rain to let up.#NZvIND pic.twitter.com/8yjyJ3fTGJ
— BCCI (@BCCI) November 18, 2022
क्रिकेटमध्ये जय जास्त महत्त्वाचा
वेलिंग्टनमध्ये पाऊस कोसळत होता. त्यावेळी प्रत्येक खेळाडू आप-आपल्या परीने मॅच सुरु होण्याची वाट पाहत होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज न्यूझीलंडच्या खेळाडूंसोबत गप्पांमध्ये रमला होता. पावसाने मॅचमध्ये व्यत्यय आणला. त्यावेळी खेळाडूंनी वॉर्मअपसाठी फुटबॉलची निवड केली. आऊटडोर ऐवजी इनडोर मॅच खेळली. इथे कोणीही जिंको, पण मैदानात क्रिकेट मॅचमध्ये विजय जास्त महत्त्वाचा आहे.