कानपूर : रवीचंद्रन अश्विन आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. तो कधी खेळाडू, तर कधी पंचांशी भिडल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. न्यूझीलंड विरुद्ध कानपूर येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये (IND vs NZ Kanpur Test) असेच काहीसे घडले. वास्तविक, न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला बाद केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात अश्विनने एक नवीन युक्ती आजमावली आणि त्याने स्टंपच्या अगदी जवळ गोलंदाजी करायला सुरुवात केली. हे करत असताना तो नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या अंपायर आणि फलंदाजासमोर अनेकवेळा आला. यावर अंपायर नितीन मेनन (Umpire Nitin Menon) नाराज झाले आणि त्यांनी अश्विनला यासाठी अनेकदा अडवले. (IND vs NZ: R. Ashwin and umpire Nitin Menon argue over his round-the-stumps run-up)
पंच नितीन मेनन यांची सूचना आर. अश्विनच्या लक्षात आली नाही आणि दोघांनी त्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. ही घटना न्यूझीलंडच्या डावाच्या 77 व्या षटकात घडली. हा वाद इथेच थांबला नाही. पुढील तीन षटके या मुद्द्यावर पंच आणि अश्विनमध्ये वाद सुरूच होता. वाद अधिकच वाढत असल्याचे पाहून कर्णधार अजिंक्य रहाणेलाही (Ajinkya Rahane) मध्यस्थी करावी लागली.
फॉलो-थ्रूमध्ये अश्विन त्यांच्यासमोर येत आहे आणि अशा स्थितीत त्यांना स्ट्राईकवर उभा असलेला फलंदाज दिसत नाही आणि कोणत्याही प्रकारचे अपील असल्यास त्यांना निर्णय देताना त्रास होईल, असा पंचांचा तर्क होता. तर अश्विनने असा युक्तिवाद केला की पंच त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखत आहेत.
अश्विन वारंवार सांगत होता की, त्याने डेंजर एरियाशी (विकेटच्या समोरचा भाग) छेडछाड केली नाही. नियमानुसार कोणताही गोलंदाज त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये डेंजर एरियात जाऊ शकत नाही. कारण असे केल्याने गोलंदाजाच्या बुटांच्या स्पाइकमुळे विकेट खराब होण्याची भीती असते.
अंपायर मेनन आणि अश्विनचे संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी जे काही करतोय, ते नियमात राहून करतोय, असे अश्विन सांगत होता. अश्विन आणि पंच मेनन यांच्यात मैदानावर वारंवार वाद होत असल्याचे पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड याने थेट सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या केबिनकडे धाव घेतली आणि या मुद्द्यावर दोघांमध्ये संभाषण झाले. या भेटीनंतर पुन्हा मैदानावर अंपायर आणि अश्विन यांच्यात वाद झाला नाही.
Ashwin argues with umpire Nitin Menon pic.twitter.com/R5qMxyeDi0
— Sunaina Gosh (@Sunainagosh7) November 27, 2021
Umpire: “You are obstructing my vision”
Rahane: “He’s not running on to the danger area.”
Umpire: “I can’t make the LBW calls.”
Ashwin: “You are anyways not making any”
Ashwin starts around the wicket and ends up at the non-striker going diagonal.
Umpire: “Confuse kar rahe ho ki confuse ho rahe ho” ?
I love this guy, staying within the rules he will exploit every possible option to win a battle? . @ashwinravi99 is masterclass for sure ? pic.twitter.com/ttLzH0PvoC
— CricHM ? ?? (@HM_rathi) November 27, 2021
इतर बातम्या
Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य…
Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?
(IND vs NZ: R. Ashwin and umpire Nitin Menon argue over his round-the-stumps run-up)