मुंबई: न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताने (India vs New Zealand) आपला कसोटी संघ नुकताच जाहीर केला आहे. 16 सदस्यीय या जगात काही नव्या खेळाडूंनाही जागा मिळाली आहे. तर काही खेळाडूंना बऱ्याच काळानंतर संघात स्थान मिळालं आहे.यावेळी एका मुंबईच्या खेळाडूला संघात पहिल्यांदाच स्थान मिळालं आहे. तो खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer). तर जयंत यादव याला टेस्ट सीरीजमध्ये तब्बल 4 वर्षानंतर पुन्हा संधी मिळाली आहे. न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पहिला टेस्ट सामना तर 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
ICYMI: Here’s India’s squad for the 2⃣-match #INDvNZ Test series ?#TeamIndia pic.twitter.com/gQcaKa1YWS
— BCCI (@BCCI) November 12, 2021
दरम्यान प्रथमच संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरचं याआधीचं भारतीय सघाती रेकॉर्ड उत्तम आहे. त्याने 22 वनडे आणि 29 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अय्यरने 22 वनडेमध्ये 8 अर्धशतकं आणि 1 शतकं ठोकत 813 रन केले आहेत. 29 T20 सामन्यात 550 रन केले आहेत. याशिवाय श्रेयसने 92 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. ज्यात 52.18 च्या सरासरीने त्याने 4 हजार 592 रन केले असून त्याचा सर्वोच्च स्कोर नाबाद 202 आहे. यात 12 शतक आणि 23 अर्धशतकंही समाविष्ट आहेत.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.
बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा मंगळवारी केली होती. टी-ट्वेन्टीच्या टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आलीय. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.
हे ही वाचा
(IND vs NZ series Shreyas Iyer included first time in test team)