IND vs NZ: नव्या खेळाडूचा Ajinkya Rahane ला धोका, उपकर्णधाराच्या करिअरवर टांगती तलवार

| Updated on: Nov 15, 2021 | 1:49 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी अनेक नवे खेळाडू भारतीय संघात पदार्पण करणार आहेत.

IND vs NZ: नव्या खेळाडूचा Ajinkya Rahane ला धोका, उपकर्णधाराच्या करिअरवर टांगती तलवार
Ajinkya Rahane
Follow us on

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पराभव विसरुन टीम इंडियाला आता आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील टी-20 आणि कसोटी मालिकेवर लक्ष द्यायचे आहे. दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केले आहेत. टी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर कसोटी मालिकेत कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत (पहिल्या कसोटी सामन्यात) उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाची धुरा सांभाळेल. (IND vs NZ : Shreyas Iyer can replace Ajinkya Rahane in test team as a vice Captain)

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी अनेक नवे खेळाडू भारतीय संघात पदार्पण करणार आहेत. हे नवे खेळाडू आगामी काळात अनेक दिग्गज खेळाडूंची जागा हिसकावून घेऊ शकतात. विशेषत: अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा त्यात एक नाव मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचेही होते. अय्यर हा आतापर्यंतचा मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटनंतर आता निवडकर्त्यांना अय्यरला कसोटी क्रिकेटमध्येही आजमावायचे आहे. या फलंदाजाने चांगली कामगिरी केल्यास आगामी काळात अजिंक्य रहाणेचा पत्ता कट होऊ शकतो. रहाणे गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यर हा चांगला पर्याय ठरू शकतो.

रहाणेची खराब फॉर्मशी झुंज

गेल्या काही महिन्यांपासून अजिंक्य रहाणेचा फॉर्म खूपच खराब आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर रहाणे कोणतीही मोठी खेळी खेळण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणे पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्याची चर्चा सुरू झाली. तसेच रहाणेच्या वयाचा प्रभाव त्याच्या फॉर्मवर दिसत असल्याचे बोलले जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही रहाणेची बॅट तळपली नाही तर ही अजिंक्य रहाणेची शेवटची मालिका ठरू शकते.

अय्यरकडेही नेतृत्वगुण

श्रेयस अय्यरमध्येही उपकर्णधार बनण्याची ताकद आहे. हा खेळाडू तरुण आहे आणि टीम इंडियाकडून दीर्घकाळ खेळू शकतो. अशा स्थितीत अय्यरला उपकर्णधार बनवण्याचा मोठा फायदा संघाला होऊ शकतो. अय्यरने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही केले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने 2020 मध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. अशा स्थितीत निवड समितीने आगामी काळात त्याला नवा उपकर्णधार बनवले तर कोणालाही नवल वाटणार नाही.

रोहित शर्माचं आव्हान

रोहित शर्माला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे रोहित आता कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीतदेखील आला असून त्याने आता अजिंक्य रहाणेसमोर आव्हान निर्माण केलं आहे. विराटने या टी-20 फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे नुकतेच रोहितकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहितकडे वनडे संघाची कमानही सोपवली जाऊ शकते, अशी कुजबुज सुरु आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच आणखी काही वर्ष भारतीय संघाचा कर्णधार राहील, यात शंका नाही. मात्र उपकर्णधार म्हणून रोहितची वर्णी लागू शकते.

इतर बातम्या

Video: कांगारुंची तऱ्हाच न्यारी, विश्वविजेते झाले आणि चक्क बुटात पेय टाकून प्यायले, फुल्ल टू सेलिब्रेशन

T20 world cup Final | ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् ठोकले 10 चौकार, 3 षटकार; पराभवानंतरही केनच्या फलंदाजीची चर्चा

New Zealand vs Australia T20 world cup Final Result: वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला, ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता

(IND vs NZ : Shreyas Iyer can replace Ajinkya Rahane in test team as a vice Captain)