मुंबई : भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. यावेळी एका सहाव्या गोलंदाजाची कमी भारताला अगदी प्रकर्षाने जाणवली. दरम्यान संघात ही जबाबदारी असणारा हार्दीक गोलंदाजी न करु शकल्याने अशी परिस्थिती आली होती. पण आता समोर येणाऱ्या माहितीनुसार हार्दीक न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. हार्दीक गोलंदाजी करेल असे वाटण्यामागील कारण म्हणजे बीसीसीआयने स्वत: ट्विट करत याबाबतचा सूचक इशारा दिला आहे. त्यांनी हार्दीकचे काही सरावादरम्यानचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तो गोलंदाजी करताना दिसत आहे. हार्दिकने गोलंदाजी न करणं, त्याचा फिटनेस आणि त्याचं फॉर्ममध्ये नसणं हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. (IND vs NZ: Sunil Gavaskar Suggests two Changes in India’s Playing XI against New Zealand, Ishan in Hardik Pandya out)
भारताचे माजी कर्णधार आणि सलामीवीर सुनील गावस्कर यांनी स्पष्टपणे सांगितले की, हार्दिकने गोलंदाजी केली तर ठिक नाहीतर त्याला संघात स्थान देण्यात काही अर्थ नाही. पंड्याच्या जागी इशान किशनला संधी देण्याचा सल्ला गावसकर यांनी दिला आहे. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एका बदलाकडे गावस्कर यांनी लक्ष वेधले आहे.
स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत गावसकर स्पष्टपणे म्हणाले की, “जर हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तर मी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याच्याऐवजी इशान किशनची निवड करेन. याशिवाय मला भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान द्यायला आवडेल. संघात दोनपेक्षा अधिक बदल केले तर विरोधी संघाला तुम्ही बॅकफुटवर आहात, असा संदेश जाईल.
हार्दीक पंड्याला गोलंदाजी करताना कमरेत त्रास होत होता. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार सरावादरम्यान गोलंदाजी करताना त्याला हा त्रास होत नसल्याने तो आगामी सामन्यात नक्कीच गोलंदाजी करु शकेल. बीसीसीआयने पोस्ट केलेल्या फोटोत हार्दीक गोलंदाजीसह फलंदाजीही करत आहे. त्यामुळे पाकविरुद्ध मोठी धावसंख्या न करु शकलेला पंड्या न्यूझीलंडविरुद्ध चांगली फलंदाजी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इतर बातम्या
Photos | ‘लिटील मास्टर’च्या टेस्ट डेब्यूची हाफ सेंच्युरी; कसा होता सुनील गावस्करांचा झंझावात?
T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय
दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर
(IND vs NZ: Sunil Gavaskar Suggests two Changes in India’s Playing XI against New Zealand, Ishan in Hardik Pandya out)