मुंबई : आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत टीम इंडियाकडे हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू खेळाडू नसेल, तर न्यूझीलंडचा नियमित कर्णधार आणि फलंदाज केन विल्यमसन या मालिकेत खेळणार नाही. आता अशा परिस्थितीत टीम कॉम्बिनेशन काय असेल हा मोठा प्रश्न आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये या दोघांचा पर्याय म्हणून कोणत्या खेळाडूची निवड होणार? याबाबत क्रिकेटरसिकांमध्ये चर्चा सुरु आहे. प्लेइंग इलेव्हनची अधिकृत घोषणा झाली नसली तरी टीम कॉम्बिनेशनची स्थिती जवळपास स्पष्ट झाली आहे. (IND vs NZ: team India and New Zealand Playing XI almost done, Venkatesh Iyer will replace Hardik pandya)
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडने मंगळवारी आपला संघ जाहीर केला. केन विल्यमसनने 14 जणांच्या संघातून स्वतःला बाहेर ठेवले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले आहे की, केन विल्यमसनच्या जागी टीम साऊथी कर्णधारपद भूषवणार आहे.
न्यूझीलंड संघात केन विल्यमसनच्या जागी मार्क चॅपमनला संधी मिळू शकते. लॉकी फर्ग्युसन तंदुरुस्त झाल्यानंतर पुनरागमन करण्यास तयार असेल, तर किवी संघाच्या गोलंदाजीतही बदल दिसून येतील, अशी अपेक्षा आहे. किवी व्यवस्थापन ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने यांना विश्रांती देऊ शकते आणि त्याच्या जागी फर्ग्युसन आणि काइल जेमिसनला संधी देऊ शकतं. दुसरीकडे, भारतीय संघात हार्दिक पंड्याच्या जागी व्यंकटेश अय्यर खेळताना दिसेल.
रोहित शर्मा आणि के.एल. राहुल हे दोघे भारतीय संघाचे सलामीवीर असू शकतात. तर इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर हे मधल्या फळीचे मजबूत आधारस्तंभ असतील. संघात अश्विन आणि चहल हे 2 फिरकीपटू असतील. तर भुवनेश्वर कुमार गोलंदाजीची धुरा सांभाळेल. त्याच्यासोबत हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकते. ऋषभ पंतला पहिल्या T20 मधून विश्रांती दिली जाऊ शकते.
मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), जिमी नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, काइल जेमिसन
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जिमी निशम, काईल जेमिसन, टॉड अॅस्टले, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ईश सोढी
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
इतर बातम्या
विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!
बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता
हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त
(IND vs NZ: team India and New Zealand Playing XI almost done, Venkatesh Iyer will replace Hardik pandya)