नवी दिल्ली : क्रिकेट चाहते एसीसी इमर्जिंग आशिया कप 2023 च्या फायनलची आतुरतेने वाट पाहतायत. आतापर्यंत भारत ए ने या स्पर्धेत दमदार प्रदर्शन केलं आहे. रविवारी परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध फायनल मॅच होणार आहे. कॅप्टन यश ढुले आणि मोहम्मद हॅरिस आमने-सामने असतील. भारत ए ने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान ए ला पराभूत केलं होतं.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कोण? हे छातीठोकपणे सांगता येणार नाही. भारत ए चा फॉर्म लक्षात घेता, त्यांना विजेतेपदासाठी पसंती दिली जात आहे.
कोणाच मनोबल उंचावलेलं असेल?
फायनल खेळताना भारत ए च मनोबल उंचावलेल असेल. कारण त्यांनी लीग स्टेजमध्ये पाकिस्तानला हरवलं होतं. भारतीय खेळाडूंना फक्त अतिआत्मविश्वास नडू शकतो. बांग्लादेश विरुद्ध सामन्यात एकाक्षणी भारतीय टीम अडचणीत होती. भारताच्या सर्वच खेळाडूंनी आतापर्यंत योगदान दिलं आहे. पाकिस्तान विरुद्ध ते हेच प्रदर्शन कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
कुठे पाहता येणार फायनल सामना?
इमर्जिंग एशिया कपची फायनल मॅच 23 जुलैला दुपारी 2 वाजल्यापासून सुरु होणार आहे. भारतात मॅचची लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड App वर पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सुद्धा लाइव्ह प्रसारण पाहू शकता. भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए मध्ये सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दोन्ही टीम्सचे स्क्वॉड-
भारत ए : साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश ढुल (कॅप्टन), निशांत सिंधु, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), हर्षित राणा, मानव सुथार, आरएस हंगरगेकर, युवराज सिंह डोडिया, प्रभसिमरन सिंह, आकाश सिंह, नितीश रेड्डी, प्रदोष पॉल.
पाकिस्तान ए : सईम अयूब, साहिबजादा फरहान, ओमैर यूसुफ, तैयब ताहिर, कासिम अकरम, मोहम्मद हॅरिस (विकेटकीपर/कॅप्टन), मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अरशद इकबाल, हसीबुल्लाह खान, मेहरान मुमताज, कामरान गुलाम.