IND vs PAK: भारताला भिडण्याआधी पाकिस्तानी खेळाडूंच मन विचलित, मागितली मदत

| Updated on: Aug 28, 2022 | 11:49 AM

IND vs PAK: परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध पहिला सामना होणार आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानी खेळाडूंच मन थोडं विचलित झालं आहे.

IND vs PAK: भारताला भिडण्याआधी पाकिस्तानी खेळाडूंच मन विचलित, मागितली मदत
ind vs pak (
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारत आजपासून आपलं अभियान सुरु करणार आहे. परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध पहिला सामना होणार आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानी खेळाडूंच मन थोडं विचलित झालं आहे. ते दु:खी आहेत. त्यांनी प्रार्थना केली व मदत मागितली. बाबर आजम (Babar Azam) ते नसीन शाह पर्यंत सर्वांनी हेच केलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, पाकिस्तानी खेळाडूंना प्रार्थनेची, मदतीची गरज का भासली? त्याचं कारण आहे, पाकिस्तानात आलेला पूर आणि त्यामुळे झालेलं नुकसान.

महापुराचा मोठा फटका

पाकिस्तानच्या सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान प्रांताला महापुराचा फटका बसला आहे. जवळपास 10,000 लोक प्रभावित झाले आहेत. अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक जण बेघर झालेत. मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे. अनेक लोक बेघर झालेत. त्यांच्या डोक्यावरच छप्पर हरवलं आहे. अजूनही निसर्गाचा कोप थांबलेला नाही. म्हणूनच आशिया कप स्पर्धेसाठी आलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशवासियांसाठी प्रार्थना केली व मदतीचं आवाहन केलं.

बाबर आजम ते नसीम शाह, सर्वांकडून मदतीच आवाहन

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने पूरग्रस्तांसाठी प्रार्थना केली. या कठीण काळात सर्व देशवासियांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं बाबर म्हणाला. शाहीन शाह आफ्रिदीने सुद्धा सर्व लोकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं, जास्तीत जास्त दान करण्याचं आवाहन केलय. नसीम शाहने सुद्धा मदतीसाठी अपील केलय.

अख्तरकडून शाहीद आफ्रिदी फाऊंडेशनच कौतुक

पाकिस्तानी संघातील खेळाडूंच्या आधी शाहनवाज दहानी आणि शोएब अख्तर यांनी सुद्धा पूरग्रस्तांसाठी मदतीच आवाहन केलय. शोएब अख्तरने पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या शाहीद आफ्रिदी फाऊंडेशनच कौतुक केलं.