IND vs PAK: पाकिस्तानी क्रिकेटपटू रुग्णालयात दाखल, मेलबर्नमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर वाईट बातमी

| Updated on: Oct 24, 2022 | 8:03 AM

IND vs PAK: कोण आहे तो पाकिस्तानी क्रिकेटपटू? का त्याला रुग्णालयात दाखल केलं?

IND vs PAK: पाकिस्तानी क्रिकेटपटू रुग्णालयात दाखल, मेलबर्नमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर वाईट बातमी
Pakistan Team
Image Credit source: PCB
Follow us on

मेलबर्न: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानी क्रिकेटपटू शान मसूदला (Shan Masood) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नेट प्रॅक्टिस दरम्यान त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्या दुखापतीमधून सावरल्यानतंर तो काल टीम इंडिया (Team India) विरुद्ध खेळला. 23 ऑक्टोबरला मेलबर्नच्या मैदानात भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला झाला.

तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला

या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या मॅचनंतर पाकिस्तानसाठी एक वाईट बातमी आहे. एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला रुग्णालयात दाखल करावं लागलय. हा क्रिकेटर पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्ड कप टीमचा भाग नाहीय. पण तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला आहे. त्याचं नाव आहे, उमर अकमल.

पराभवानंतर आली ती बातमी

भारताकडून पाकचा पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तानातून उमर अकमलला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आली. या बातमीचा थेट पाकिस्तान क्रिकेट टीमशी संबंध नसेल, पण पाकिस्तान क्रिकेटशी संबंध आहे

सोशल मीडियावरुन दिली माहिती

उमर अकमलने स्वत:च रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या बेडवर झोपल्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

अकमलच्या आजारपणाच कारण स्पष्ट नाही

उमर अकमलला रुग्णालयात का दाखल करण्यात आलय? ते अजून स्पष्ट नाहीय. मेलबर्नमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं, त्याचवेळी इन्स्टाग्रामवर अकमलने ही पोस्ट टाकली.

4 विकेट राखून भारताचा विजय

भारताने पाकिस्तानला 4 विकेटने हरवलं. मेलबर्नमध्ये पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 159 धावा केल्या. भारताने शेवटच्या चेंडूवर 6 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. विराट कोहली भारताच्या या विजयाचा नायक ठरला. त्याने नाबाद 82 धावा फटकावल्या.