दुबई : भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र त्यापूर्वीच एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडिओ 23 ऑक्टोबरचा आहे ज्यात टीम इंडियाचा मेंटर एमएस धोनी आणि सलामीचा फलंदाज केएल राहुल यांना मॅच हरण्याची खुली ऑफर दिली जात आहे. प्रशिक्षणानंतर दोघेही मैदानावरून हॉटेलकडे जात असताना हा प्रकार घडला. धोनीनेही त्याच्यासमोर आलेल्या या प्रस्तावाला चोख प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणावर फारसे गंभीर होण्याची गरज नाही, कारण जे काही घडले तो केवळ गंमतीचा भाग होता. (IND vs PAK, T20 World Cup 2021, Mahi not this match please!, MS Dhoni’s epic reply at request of a Pakistani girl)
खरं तर टीम इंडिया ट्रेनिंगवरून परतत असताना पाकिस्तानची अँकर सवेरा पासा हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती. दरम्यान, तिची नजर केएल राहुलवर पडली. राहुलला पाहताच पाकिस्तानी अँकरने त्याला पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी करू नको, असे सांगितले. सवेरा पासा राहुलला म्हणाली, प्लीज उद्या चांगला खेळू नकोस. पाक अँकरने तिचं वाक्य अनेकदा रिपीट केलं, ज्यावर राहुल केवळ हसला, त्याने तिला काही उत्तर दिलं नाही.
यानंतर सवेराने धोनीला पाहिलं, ती धोनीला म्हणाली की, “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नको, ‘माही नॉट दिस मॅच प्लीज!” पण धोनी राहुलसारखा गप्प बसला नाही. त्यांने पाकिस्तानी पत्रकार सवेरा पासाच्या शब्दांना चोख प्रत्युत्तर दिले. धोनी स्पष्टपणे म्हणाला – ‘हेच तर माझे काम आहे.’ धोनीने अर्थातच नाव घेतले नाही पण त्याचा इशारा पाकिस्तानकडे होता. तो ज्या कामाबद्दल बोलत होता ते काम म्हणजे पाकिस्तानला पराभूत करणे.
banter with KL Rahul & MS Dhoni.. Interesting response from MSD ? #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/5K9zDGsPCi
— Sawera Pasha (@sawerapasha) October 23, 2021
भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघ जेव्हा भिडतात तेव्हा टीव्ही फोडण्यावरुन मिम्स, मेसेजस पाहायला मिळतात. कारण विश्वचषक स्पर्धेक भारताने पाकिस्तानला अनेकदा धूळ चारली आहे आणि त्यानंतर पाकिस्तानात अनेक ठिकाणी तिथल्या क्रिकेट चाहत्यांनी टीव्ही फोडण्याचे प्रकार केले आहेत. याच टीव्ही फोडण्यावरुन भारतीय चाहते पाकिस्तानी फॅन्सना नेहमी डिवचत असतात. आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीसाठी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते दुबईला पोहोचत आहेत. आजच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचे बशीर चाचा देखील शिकागोहून दुबईला पोहोचले आहेत, तर भारतातील भारतीय संघाचे मोठे चाहते सुधीर गौतम देखील दुबईला गेले आहेत.
भारत आणि पाकिस्तानचे हे दोन सुपर फॅन्स दुबईमध्ये भेटले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दोन्हीकडच्या फॅन्समध्ये वाद झाला. टीव्ही फोडण्यावरुन भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सना डिवचलं. सुधीर गौतम म्हणाले की, चाचा यावेळीदेखील पाकिस्तानात टीव्ही फोडले जातील. यावर बशीर चाचा म्हणाले की, पाकिस्तान प्रत्येक वेळी टीव्ही का फोडेल? यावेळी टीव्ही भारतात फोडले जातील. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये एकत्र दिसणाऱ्या क्रिकेटच्या या दोन सुपर फॅन्समध्ये अशीच गंमतीदार भांडणे पाहायला मिळाली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषकातील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, 7 वाजता नाणेफेक होईल. टीम इंडियाचा टी 20 विश्वचषक 2021 पाकिस्तान विरोधातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्हाला भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेच मॅचचे अपडेटस मिळतील. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या www.tv9marathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. या मॅचचे ऑनलाईन लाॉईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहू शकता.
तर बातम्या
(IND vs PAK, T20 World Cup 2021, Mahi not this match please!, MS Dhoni’s epic reply at request of a Pakistani girl)