मुंबई: भारतच नाही, जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीची प्रतिक्षा आहे. सगळेच या मॅचची आतुरतेने वाट पाहतायत. भारत-पाक सामन्यात चाहत्यांना क्रिकेटचा (Cricket) एक वेगळा रोमांच, थरार अनुभवता येतो. त्यामुळे टेस्ट, वनडे असो वा टी 20 क्रिकेट चाहते नेहमीच या मॅचची (Match) आतुरतेने वाट पाहत असतात.
थोडं टेन्शन वाढवणारी बातमी
ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप सुरु झाला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचा क्षण जवळ येतोय. 23 ऑक्टोबरला ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात दोन्ही टीम्स आमने-सामने येतील. या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर महासंकट आहे. जमीन नाही, तर आकाशातून हे संकट कोसळू शकतं.
आनंदावर विरजण पडू शकतं
टी 20 वर्ल्ड कपमध्ये 23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना होईल. मेलबर्नच्या हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडू शकतं. मॅचच्या दिवशी मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस खेळ बिघडवू शकतो. मॅचच्या एकदिवस आधी सुद्धा मेलबर्नमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे. म्हणून हे आसमानी संकट जास्त मोठं आहे.
IND vs PAK मॅचआधी वाईट बातमी
वेदर फोरकास्ट एजन्सीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या 3 राज्यात 20 ऑक्टोबरपासून पाऊस कोसळू शकतो. हवामान या दिवसात थंड राहील. बदलत्या हवामानाचा परिणाम मेलबर्नमध्ये सुद्धा दिसेल.
हवामानाची माहिती देणाऱ्या एक्यूवेदरनुसार, मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला सकाळी पाऊस कोसळू शकतो. त्यानंतर संपूर्ण दिवस ढगाळ हवामान राहील. मॅचच्या एकदिवस आधी 22 ऑक्टोबरला आकाशात काळे ढग असतील. अधून-मधून पाऊस सुरु राहिलं.
मॅच न झाल्यास काय होईल?
मॅच सुरु होण्याच्या 24 तास आधी मेलबर्नमधील हवामान बिघडलेलं असेल. सामन्याच्यावेळी असं काही नको होऊं दे अशीच चाहत्यांची इच्छा असेल. भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला, तर अशा स्थितीत दोन्ही टीम्सना 1-1 पॉइंट मिळेल.