अहमदाबाद : आज वर्ल्ड कप 2023 मधील महामुकाबला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तानच्या टीम आमने-सामने असतील. आतापर्यंत वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध नेहमीच अजिंक्य राहिली आहे. आता कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हाच रेकॉर्ड काय ठेवण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याला आता फक्त काही तास उरले आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही टीम फॉर्ममध्ये आहेत. पाकिस्तान टीम कमकुवत भासत होती. पण श्रीलंकेविरुद्ध त्यांनी 344 धावांच विशाल टार्गेट चेस केलं. त्यामुळे सहाजिकच त्यांचा आत्मविश्वास उंचावला असणार. त्याचवेळी टीम इंडियाने आपले पहिले दोन्ही सामने दिमाखात जिंकले आहेत. आधी बलाढ्य ऑस्ट्रेलिया त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवला. त्यामुळे आजच्या सामन्यात काँटे की टक्कर पहायला मिळेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी काही मत व्यक्त केली आहेत. या सामन्याकडे नेहमीच भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजी म्हणून पाहिल जातं.
पाकिस्तानकडे एकापेक्षा एक सरस वेगवान गोलंदाज आहेत. टीम इंडियाने आज कोणाला खेळवाव? या बद्दल गावस्करांनी आपल मत सांगितलं. टीम इंडियाने तीन वेगवान गोलंदाज की, तीन फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळाव असा प्रश्न गावस्कर यांना विचारला. त्यावर त्यांनी रविचंद्रन अश्विनचा टीममध्ये समावेश करावा असं मत व्यक्त केलं. “पाकिस्तानी टीममध्ये सौद शकीलसारखा प्लेयर आहे. पाकिस्तानला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी अश्विनला खेळवाव असं गावस्कर म्हणाले. अश्विन फक्त ऑफ स्पिनर आहे म्हणून नाही, तर तो हुशार आहे. सौद शकीलसारखा प्लेयर समोर असताना अश्विन टीममध्ये हवा, तो आठव्या नंबरवर फलंदाजीला येऊन 20-30 धावांचे योगदानही देऊ शकतो” असं गावस्कर म्हणाले.
बुमराहच्या भात्यात असा कुठला चेंडू आहे?
शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, हसन अली हे पाकिस्तान वेगवान गोलंदाज विरुद्ध जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी असा सामना होणार का? यावर गावस्करांनी जसप्रीत बुमराहला झुकत माप दिलं. जसप्रीत बुमराह जास्त प्रभावी ठरेल असं गावस्कर म्हणाले. “बुमराह टीममध्ये आल्यामुळे नक्कीच फायदा झालाय. बुमराहकडे आऊटस्विंगर होता. पण आता त्याने लेट आऊटस्विंगरवर हुकूमत मिळवलीय. बुमराहचा आऊटस्विंग इंग्लंडमध्ये प्रभावी ठरायचा. पण आता भारतीय विकेटवर बुमराहच आऊटस्विंग जास्त घातक ठरतोय. तुम्ही पाहिलं असेल, सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये तो विकेट काढून देतोय”