मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून तीन टी 20 सामन्यांच्या सीरीजला सुरुवात झाली आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर आज पहिली मॅच सुरु आहे. टीम इंडियाने पहिल्या टी 20 मॅचमध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. दीपक चाहर आणि अर्शदीप सिंहच्या भन्नाट स्विंग गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डर कोसळली. अर्शदीप सिंह आणि दीपक चाहरच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी अक्षरक्ष: शरणगती पत्करली.
चाहर-अर्शदीप जोडीसमोर काहीच चाललं नाही
सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रिकन फलंदाजांच चाहर-अर्शदीप जोडीसमोर काहीच चाललं नाही. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर दीपक चाहरने कॅप्टन टेंबा बावुमाला क्लीन बोल्ड केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर अर्शदीपने दुसऱ्या ओव्हरमध्ये भन्नाट गोलंदाजी केली.
अर्शदीपची जबरदस्त गोलंदाजी
त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या. आधी सलामीवीर क्विंटन डि कॉकला 1 रन्सवर बोल्ड केलं. त्यानंतर रिली रुसोला ऋषभ पंतकरवी झलेबाद केलं. ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर डेविड मिलरला बोल्ड केलं. त्यानंतर पुढच्याच षटकात दीपक चाहरने ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकरवी झेलबाद केलं.
5 wickets summed up in 11 seconds. Watch it here ??
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia pic.twitter.com/jYeogZoqfD— BCCI (@BCCI) September 28, 2022
चार फलंदाज शुन्यावर बाद
अवघ्या 3 ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रिकेची स्थिती 5 बाद 9 धावा होती. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. भारतीय बॉलर्सच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा टीकाव लागला नाही. हर्षल पटेलने आठव्या षटकात दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिला. चांगली फलंदाजी करणाऱ्या एडन मार्करामला 25 धावांवर पायचीत पकडलं. दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.