मुंबई: टीम इंडिया (Team India) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळत आहे. आधी दिल्ली आणि नंतर कटक येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ओदिशा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडिया बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागात अपयशी ठरली. भारताचा पराभव झाला असला, तरी दुसऱ्या टी 20 सामन्यातील छाती अभिमानाने फुलून येईल, असा एक सुंदर व्हिडिओ समोर आलाय. भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामना (IND vs SA) सुरु असताना, हजारो प्रेक्षक ‘मा तुझे सलाम’ हे गाणं गुणगुणत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
सामना सुरु होण्याआधीच हे दृश्य आहे, जेव्हा सगळं मैदान भरलं होतं. हजारो प्रेक्षक मैदानावर पोहोचले होते, व त्यांनी आपली मोबाइलची फ्लॅश लाइट ऑन केली होती. असंच दृश्य 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळालं होतं.
Audience in Cuttack unanimously sing Maa Tujhe Salam at the Ind VS SA that was hosted in the Barabati Stadium #INDvsSA #Cuttack #BarabatiStadium #Odisha #T20Blaze pic.twitter.com/ZVknDoc9GF
— Odishalinks (@odisha_links) June 12, 2022
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 4 विकेटने पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 148 धावा केल्या होत्या. धावा कमी होत्या, तरी फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. पहिल्या 10 षटकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 57 होती. भुवनेश्वर कुमारने पावरप्लेमध्ये तीन विकेट काढून चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र तरीही टीम इंडियाचा पराभव झाला.