IND vs SA | सॅमसन-अर्शदीपपेक्षाही KL Rahul टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो, कसं काय?

| Updated on: Dec 22, 2023 | 11:17 AM

IND vs SA | बोलँड पार्कवर वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 78 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ही वनडे सीरीज 2-1 ने जिंकली. शेवटच्या सामन्यात अर्शदीप सिंह आणि संजू सॅमसन विजयाचे हिरो ठरले. पण या दोघांपेक्षाही केएल राहुलच योगदान मोठ आहे.

IND vs SA | सॅमसन-अर्शदीपपेक्षाही KL Rahul टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो, कसं काय?
IND vs SA ODI Series win
Image Credit source: AFP
Follow us on

IND vs SA 3rd ODI | बरोबर पाच वर्षानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडे सीरीज जिंकलीय. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही कमाल केली. 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा वनडे सीरीज जिंकली होती. पार्लच्या बोलँड पार्कवर आवेश खानने दक्षिण आफ्रिकन फलंदाज ब्यूरेन हेंड्रिक्सचा विकेट घेताच, टीम इंडियाने तीन सामन्यांची वनडे सीरीज 2-1 ने जिंकली. आकड्याच्या हिशोबाने संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंह टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. पण सामना भारताच्या बाजूने झुकवण्यात केएल राहुलची महत्त्वाची भूमिका राहिली.

सीरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 78 धावांनी हरवलं. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 296 धावांचा डोंगर उभारला. संजू सॅमसनने या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यातील आपल पहिल शतक झळकावलं. त्याने 108 धावा केल्या. तिलक वर्माने 52 धावा केल्या. अर्शदीप सिंहने 4 आणि वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट काढल्या. दक्षिण आफ्रिकेचा डाव 218 धावांवर संपवला.

राहुल कसा हिरो?

केएल राहुलच्या रोलबद्दल बोलायच झाल्यास त्याने या सामन्यात फक्त 21 धावा केल्या. विकेटकीपिंग करताना 4 कॅच घेतल्या. बॅटिंगमध्ये त्याच योगदान मोठ नव्हत, पण महत्त्वाच होतं. टीम इंडियाने 49 रन्सवर 2 विकेट गमावले होते, त्यावेळी राहुल क्रीजवर आला. संजू सॅमसनसोबत राहुलने मिळून 52 धावा जोडल्या. राहुलच खरं योगदान कॅप्टनशिपमध्ये आहे. त्याच्या निर्णयाने मॅचवर प्रभाव टाकला.

निर्णयाने बदलला गेम

नेहमी टीकेचा सामना करणाऱ्या केएल राहुलने आपल नेतृत्व कौशल्य दाखवून दिलं. संजू सॅमसनला तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय यशस्वी ठरला. त्याआधी सॅमसन पाचव्या नंबरवर बॅटिंग करायचा. तिलक तिसऱ्या स्थानावर यायचा. दोन्ही खेळाडूंची पोजिशन बदलली. आयपीएलमध्ये ते ज्या नंबरवर खेळतात, त्याच क्रमांकावर फलंदाजीसाठी आले.

राहुलचा अचूक निर्णय, दक्षिण आफ्रिकेची घसरण

फील्डिंग दरम्यान राहुलच्या काही निर्णयांनी कमाल केली. अर्शदीपने सुरुवातीला चांगली गोलंदाजी करुन पहिल यश मिळवून दिलं. त्यानंतर टोनी डि जॉर्जी भारताची डोकेदुखी वाढवत होता. 30 व्या ओव्हरमध्ये अर्शदीपने पुनरागमन करताना चौथ्या चेंडूवर यश मिळवून दिलं. यात राहुलचा हात होता. अंपायरने LBW च अपील नाकारल होतं. राहुलने लगेच DRS घेतला. निर्णय भारताच्या बाजूने आला. तिथून दक्षिण आफ्रिकेची घसरण सुरु झाली.


राहुलची कमालीची नजर

34 व्या ओव्हरमध्ये सुद्धा असच झालं. वॉशिंगटन सुंदरच्या चेंडूवर वियान मुल्डर विरोधात कॅचच अपील झालं. अंपायरने नॉट आऊट दिलं. पण राहुलला आत्मविश्वास होता. त्याने पुन्हा DRS ची मदत घेतली. रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या किनाऱ्याला चाटून गेल्याच दिसलं. राहुलने क्षणाधार्त कॅच घेतली. अंपायरला नाबाद ठरवण्याचा निर्णय बदलावा लागला. अशाप्रकारे भारताला आणखी एक यश मिळालं.