मुंबई: ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिकाही टीम इंडियाने जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमधला अवघा एक सामना बाकी आहे. टीम इंडियाकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. T20 वर्ल्ड कपआधी उद्या म्हणजेच मंगळवारी टीम इंडिया शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्याच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्माकडे वर्ल्ड कपआधी प्रयोग करण्याची शेवटची संधी आहे.
दोन नव्या खेळाडूंना संधी?
मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरला टीममध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. मोहम्मद सिराजचाही टीममध्ये समावेश होऊ शकतो. विराट कोहलीला तिसऱ्या टी 20 साठी विश्रांती दिली जाणार आहे. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
ऋषभ पंतच काय ?
केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या सगळ्यांनी या सीरीजमध्ये धावा केल्या आहेत. टॉप ऑर्डर चांगली कामगिरी करतोय. ऋषभ पंतला संधी मिळालेली नाही. दिनेश कार्तिकच 5 व्या नंबरवर प्रमोशन झाले.
दीपक हुड्डा दुखापतग्रस्त
एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असेल किंवा आऊट ऑफ फॉर्म असेल, तर काय? हीच शक्यता लक्षात घेऊन टीम मॅनेजमेंट ऋषभ पंतला वरती टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी पाठवू शकते.
स्टँडबाय खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर आहे. दीपक हुड्डा दुखापतग्रस्त आहे. तो एनसीएमध्ये आहे. त्यामुळे बॅकअप तयार असणं गरजेच आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला सूर्यकुमार यादवच्या जागी संधी मिळू शकते.
गोलंदाजी अजूनही चिंतेचा विषय
गोलंदाजी विभागात अजूनही चिंता आहे. शेवटच्या चार ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 65 धावा दिल्या. मागच्या 5-6 सामन्यात हेच दिसून आलय. रोहित शर्माने या समस्येवर तोडगा काढणं गरजेच असल्याचं म्हटलं आहे.
तिसऱ्या टी 20 संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, अर्शदीप सिंह/मोहम्मद सिराज