IND vs SA: ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूर सोशल मीडियावर हिरो, पाहा एकापेक्षा एक भन्नाट ‘मीम्स’

| Updated on: Jan 04, 2022 | 6:52 PM

आज सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून शार्दुल ठाकूरवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

1 / 10
 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्यादिवशी पालघरचा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) संघासाठी संकटमोचक ठरला आहे.

2 / 10
जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्यादिवशी कर्णधार डीन एल्गर आणि कीगन पीटरसनची जोडी जमली होती. दोघेही मोठी धावसंख्या उभारु शकतात, असे वाटत होते. दोघांनी मिळून 200 पेक्षा जास्त चेंडू खेळले होते.

3 / 10
शार्दुल ठाकूने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला आहे.

4 / 10
शार्दुलने लंचआधी दक्षिण आफ्रिकेच्या तीन महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्याने सर्वप्रथम एल्गर आणि पीटरसनची जमलेली जोडी फोडली. त्यानंतर त्याने अर्धशतक ठोकणाऱ्या पीटरसनला बाद केले. त्यानंतर त्याने लगेच रासी वॅन डार दुसांलाही आऊट केले.

5 / 10
लंचनंतर शार्दुल ठाकूर पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला आहे. त्याने टेंबा बावुमा आणि वेरेनेची जमलेली जोडी फोडली.

6 / 10
दोघांनी 60 धावांची भागीदारी केली होती. शार्दुलने वेरेनला 21 धावांवर पायचीत पकडले तर बावुमाला 51 धावांवर पंतकरवी झेलबाद केले.

7 / 10
शार्दुलने आज आपल्या कामगिरीने सर्वांचीच मन जिंकून घेतली. कारण पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात तो विशेष चमक दाखवू शकला नव्हता.

8 / 10
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने बॅटने विशेष काही करुन दाखवले नव्हते. शार्दुलची संघात निवड होण्यामागे त्याची अष्टपैलू कामगिरी लक्षात घेतली जाते.

9 / 10
गोलंदाजी बरोबर फलंदाजी करण्याचीही शार्दुलची क्षमता आहे. म्हणनूच पहिल्या कसोटीत अनुभवी इशांत शर्माला बेंचवर बसवून त्याची संघात निवड करण्यात आली होती.

10 / 10
आज सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.