IND vs SA : टीम इंडियासोबत पहिल्या दिवशी बेईमानी? मयांक अग्रवालच्या विकेटवरुन फॅन्स भडकले, वसीम जाफरचं भन्नाट मीम

| Updated on: Dec 27, 2021 | 11:56 AM

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पहिल्या टेस्टला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या बॅटसमन्सने 3 विकेटसवर 272 धावा केल्या. पहिल्या दिवशी के. ए. राहुलनं नाबाद राहत 122 धावा केल्या.

IND vs SA : टीम इंडियासोबत पहिल्या दिवशी बेईमानी? मयांक अग्रवालच्या विकेटवरुन फॅन्स भडकले, वसीम जाफरचं भन्नाट मीम
मयांक अग्रवाल
Follow us on

सेंच्युरियन: टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पहिल्या टेस्टला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या बॅटसमन्सने 3 विकेटसवर 272 धावा केल्या. पहिल्या दिवशी के. ए. राहुलनं नाबाद राहत 122 धावा केल्या. तर, मयांक अग्रवाल 60 धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा खातं खोलू शकला नाही. तर, कॅप्टन विराट कोहलीनं 35 धावा केल्या. पहिल्या दिवस अखेर के. एल. राहूल आणि अजिंक्य रहाणे नाबाद राहिले आहेत. मात्र, पहिल्या दिवशी फार्मात असलेला टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवाल याला आऊट दिल्यानं फॅन्सनी अंपायरिंगवर आक्षेप घेतला आहे.

नेमक काय घडलं?

मयांक अग्रवाल हा 60 धावांवर बॅटिंग करत होता. लुंगी निगीडीच्या बोलिंगवर त्याला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आलं होतं. लुंगी निगीडीच्या बोलिंगवर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं एलबीडब्ल्यूचं अपील केलं होतं. मैदानातील पंचांनी त्याला नॉटआऊट दिल्यानंतर आफ्रिकेनं डीआरएस मागितला. डीआरएसचा निर्णय हा अंपायर कॉल असायला हवा होता असं फॅन्सचं मत असून तो दक्षिण आफ्रिकेच्या फेव्हरमध्ये गेल्याचा आरोप करण्यात यते आहे.

अंपायर कॉल असायला हवा होता

मयांक अग्रवालला आऊट देण्याचा निर्णय योग्य होता काय यावरुन वाद निर्माण झाला आहे. डीआरएसचा निर्णय हा अंपायर कॉल असायला हवा कारण लुंगी निगीडीनं टाकलेला चेंडू हा बॅक ऑफ लेंथ होता. तर, मयांक अग्रवालच्या पायावर वरच्या बाजूला लागला होता. त्यामुळं फॅन्सनी थर्ड अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

वसीम जाफरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर

टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफर यानं मयांक अग्रवाल ज्या पद्धतीनं आऊट देण्यात आलं त्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. अंपायरच्या निर्णयावर वसीम जाफरनं अनोख्या पद्धतीनं नापसंती दर्शवलीय.

मयंक अग्रवालची ‘हॅट्रिक’

मयांकने अर्धशतक झळकावत आपला फॉर्म कायम राखला आहे. त्याने सलग तीन कसोटी डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मयांकने न्यूझीलंड विरुद्ध मुंबई कसोटीत 150 धावांची शतकी आणि 62 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती.

इतर बातम्या:

IND VS SA: केएल राहुलचं शतक, अग्रवालचं सलग तिसरं अर्धशतक, पहिला दिवस भारताच्या नावावर

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या जखमेवर मीठ चोळत मयांकची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’

IND vs SA: Controversial Mayank Agarwal dismissal spurs ball tracking debate wasim jaffer share meme