मुंबई: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिकेतील पहिला T 20 सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हा निर्णय योग्य ठरवता आला नाही. इशान किशन (Ishan Kishan), ऋषभ पंत, हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 211 धावा केल्या आहेत. इशान किशनने आज जबरदस्त फलंदाजी केली. आयपीएलमधील अपयश त्याने इथे धुवून काढलं. त्याने 48 चेंडूत 76 धावा चोपल्या. यात 11 चौकार आणि 3 षटकार होते. इशान आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सलामी दिली. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात भारताने बिनबाद 51 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात पर्नेलने दक्षिण आफ्रिकेला पहिलं यश मिळवून दिलं.
इशानने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कसं चोपलं, ते इथे क्लिक करुन VIDEO पहा
ओव्हरच्या सुरुवातीलाच गायकवाडने षटकार ठोकला होता. पण दुसऱा चेंडू कव्हर्सला मारण्याच्या प्रयत्नात त्याने मिडविकेटला बावुमाकडे सोपा झेल दिला. ऋतुराज गायकवाडने 15 चेंडूत 23 धावा केल्या. यात 3 षटकार होते. पहिल्या 10 षटकात भारताच्या 1 बाद 102 धावा झाल्या होत्या.
??????? ?????!
A superb batting show by #TeamIndia to post 211/4 on the board. ? ?
Over to our bowlers now. ? ?
Scorecard ▶️ https://t.co/YOoyTQmu1p #INDvSA | @Paytm pic.twitter.com/Sz0FovFdcU
— BCCI (@BCCI) June 9, 2022
इशान बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने धावगती धीमी होऊ दिली नाही. त्याने सुद्धा फटकेबाजी केली. श्रेयसने 27 चेंडूत 36 धावा केल्या. यात एक चौकार आणि 3 षटकार होते. ऋषभ पंतने 16 चेंडूत 29 धावा करताना दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक पंड्याने आयपीएलचा फॉर्म इथेही कायम ठेवला. त्याने व्हाइस कॅप्टनपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने 12 चेंडूत 31 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 षटकार होते.
भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टीम इंडियाच्या आधी कोरोना व्हायरसने झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका टॉप फलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे. एडन मार्करमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.