IND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव

| Updated on: Jan 24, 2022 | 10:45 AM

भारताचा याच मैदानावर मागच्या आठवड्यात कसोटी मालिकेत पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप विजय मिळवण्यापासून रोखण्याचे भारतासमोर आव्हान आहे.

IND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात, सलग तिसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव
Follow us on

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) आज वनडे सीरीजमधील (one day series) शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने भारताला पराभूत करत भारतावर क्लीन स्विप विजय मिळवला आहे. कॅपटाऊनच्या (cape town) न्यूलँडस मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात द. आफ्रिकेने भारतावर 4 धावांनी मात केली. शतककवीर क्विंटन डीकॉक आफ्रिकेच्या या विजयाचा हिरो ठरला. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने भारतासमोर 288 धावांचं आव्हान दिलं. होतं. हे आव्हान टीम इंडियाला पेलवलं नाही. टीम इंडिया 49.2 षटकांमध्ये सर्वबाद 283 धावांपर्यंत मजल मारु शकली. या विजयासह द. आफ्रिकेने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. याआधीत उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेली कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-1 अशा फरकाने जिंकली होती.

भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका: टेंबा बवुमा (कर्णधार), यानमन मलान, क्विंटवन डिकॉक (विकेटकिपर), एडन मार्करम, रेसी वान डर डुसें,डेविड मिलर, एंडिले फेहुलकवायो, सिसांदा मगाला, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी.

Key Events

क्विंटन डीकॉकचं शतक

सामन्याच्या सुरुवातीला द. आफ्रिकेची 3 गडी बाद 70 धावा अशी स्थिती असताना सलामीवीर क्विंटन डीकॉकने एक बाजू लावून धरली होती. डीकॉकने रॅस्सी वॅन डेर डुसें याच्यासोबत 144 धावांची भागीदारी करत द. आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. त्याने शतकी खेळीसह द. आफ्रिकेला या सामन्यात मजबूत स्थितीन नेऊन ठेवलं. डीकॉकने 108 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. शतकानंतरही डीकॉकने हल्लाबोल चालूच ठेवला. अखेर जसप्रीत बुमराहने डीकॉक आणि दुसें यांची भागीदारी मोडली. त्याने शतकवीर क्विंटन डीकॉकला 124 धावांवर असताना शिखर धवनकरवी झेलबाद केलं.

भारताकडून धवन, कोहली, चाहरची अर्धशतकं

प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने भारतासमोर 288 धावांचं आव्हान दिलं. होतं. हे आव्हान टीम इंडियाला पेलवलं नाही. टीम इंडिया 49.2 षटकांमध्ये सर्वबाद 283 धावांपर्यंत मजल मारु शकली. मात्र या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली. या सामन्यात भारताकडून सलामीवीर शिखर धवन (61), विराट कोहली (65) आणि दीपक चाहर (54) यांनी अर्धशतकं झळकावत भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. मात्र या तिघांच्या खेळी अखेर व्यर्थ ठरल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 23 Jan 2022 10:24 PM (IST)

    भारताचा अखेरचा फलंदाज बाद, द. आफ्रिकेची भारतावर 4 धावांनी मात

    अखेरच्या 5 चेंडूत 5 धावांची आवश्यकता असताना ड्वेन प्रिटोरियसने युजवेंद्र चहलला (2) डेव्हिड मिलरकरवी झेलबाद केलं.

  • 23 Jan 2022 10:11 PM (IST)

    भारताला 8 वा धक्का, दीपक चाहर 54 धावांवर बाद

    भारताने महत्त्वाची विकेट गमावली आहे. लुंगी एंगिडीने दीपक चाहरला ड्वेन प्रिटोरियसकरवी झेलबाद केलं. चाहरने 54 धावांची खेळी केली. (भारत – 278/8)

  • 23 Jan 2022 10:08 PM (IST)

    दीपक चाहरचं अर्धशतक, सामना भारताच्या बाजून झुकवला

    7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येवून दीपक चाहरने शानदार आणि जलद अर्धशतक फटकावून सामना बारताच्या बाजूने झुकवला आहे. त्याने 31 चेंडूत 51 धावा फटकावल्या आहेत. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

  • 23 Jan 2022 10:02 PM (IST)

    दीपक चाहरचे सलग दोन चौकार

    46 व्या षटकात लुंगी एंगिडीच्या गोलंदाजीवर दीपक चाहरने सलग दोन चौकार लगावत सामना भारताच्या बाजून झुकवला आहे. भारताला आता 22 चेंडूत 17 धावांची आवश्यकता आहे. (भारत 46.2 षटकात 271/7)

  • 23 Jan 2022 09:50 PM (IST)

    दीपक चाहरचे सलग दोन षटकार

    44 व्या षटकात ड्वेन प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर दीपक चाहरने सलग दोन षटकार ठोकत सामन्यातील भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारताला आता 33 चेंडूत 37 धावांची आवश्यकता आहे. (भारत 44.3 षटकात 251/7)

  • 23 Jan 2022 09:42 PM (IST)

    भारताचा 7 वा गडी बाद, जयंत यादव 2 धावा करुन माघारी

    द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना 7 वी विकेट मिळवण्यात यश आलं आहे. जयंत यादव 2 धावा करुन माघारी परतला. लुंगी एंगिडीच्या गोलंदाजीवर टेम्बा बवुमाने सुरेख झेल टिपत त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (भारत – 195/5)

  • 23 Jan 2022 09:28 PM (IST)

    भारताला 6 वा धक्का, सूर्यकुमार यादव 39 धावांवर बाद

    भारताने 6 वी विकेट गमावली आहे. ड्वेन प्रिटोरियसने सूर्यकुमार यादवला 39 धावांवर असताना टेम्बा बवुमाकरवी झेलबाद केलं. (भारत – 210/6)

  • 23 Jan 2022 09:16 PM (IST)

    भारताचा 5 वा गडी बाद, श्रेयस अय्यर 26 धावा करुन माघारी

    द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना 5 वी विकेट मिळवण्यात यश आलं आहे. श्रेयस अय्यर 26 धावा करुन माघारी परतला. त्याला सिसंदा मगाला याने त्याला बाद केलं. (भारत – 195/5)

  • 23 Jan 2022 08:51 PM (IST)

    शतकाची पुन्हा एकदा हुलकावणी, विराट कोहली 65 धावांवर बाद

    गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहली शतक झळकावू शकलेला नाही. आजच्या सामन्यात देखील विराटने अर्धशतक लगावल्यानंतर त्याला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. 65 धावांवर असताना केशव महाराजने विराटला टेम्बा बवुमाकरवी झेलबाद केलं. (भारत – 156/4)

  • 23 Jan 2022 08:27 PM (IST)

    विराट कोहलीचं अर्धशतक

    विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत अर्धशतक लगावलं आहे. त्याने 63 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या.

  • 23 Jan 2022 08:22 PM (IST)

    भारताला तिसरा धक्का, धवनपाठोपाठ ऋषभ पंत माघारी

    भारताने तिसरी विकेट गमावली आहे. Andile Phehlukwayo ने ऋषभ पंतला (0) सिसंदा मगालाकरवी झेलबाद केलं. (भारत 118/3)

  • 23 Jan 2022 08:13 PM (IST)

    भारताला दुसरा धक्का, शिखर धवन 61 धावांवर बाद

    भारताला दुसरा धक्का बसला आहे. Andile Phehlukwayo ने शिखर धवन 61 धावांवर असताना त्याला यष्टीरक्षक क्विंटन डीकॉककरवी झेलबाद केलं.

  • 23 Jan 2022 08:00 PM (IST)

    शिखर धवनचं अर्धशतक, भारत 100 पार

    सलामीवीर शिखर धवनने 58 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक फटकावलं आहे. त्याने आणि विराट कोहलीने (41) आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 95 धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे भारताने 21 षटकात 1 बाद 113 धावांपर्यंत मजल मारली आहे.

  • 23 Jan 2022 07:13 PM (IST)

    धवनचा हल्लाबोल

    8 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या ड्वेन प्रिटोरियसवर शिखर धवनने हल्लाबोल केला. धवनने या षटकात एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 धावा वसूल केल्या.

  • 23 Jan 2022 07:03 PM (IST)

    भारताला पहिला धक्का, केएल राहुल 9 धावांवर बाद

    भारताला पहिला धक्का बसला आहे. लुंगी एंगिडीने केएल राहुलला 9 धावांवर असताना जानेमन मलानकरवी त्याला झेलबाद केलं. (भारत 18/1)

  • 23 Jan 2022 06:52 PM (IST)

    भारताची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच षटकात राहुलचे दोन चौकार

    केएल राहुलने भारताच्या डावाची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्याने लुंगी एंगिडीच्या पहिल्याच षटकात दोन चौकार लगावले. (भारत 8/0)

  • 23 Jan 2022 06:50 PM (IST)

    भारताच्या डावाला सुरुवात, केएल राहुल-शिखर धवन मैदानात

    288 धावांचं आव्हान घेऊन भारताचे सलामवीर केएल राहुल आणि शिखर धवन मैदानात उतरले आहेत. लुंगी एंगिडी पहिल्या षटकात गोलंदाजी करेल.

  • 23 Jan 2022 06:06 PM (IST)

    भारताला 10 वं यश, सिसंदा मगाला शून्यावर बाद

    भारताला 10 वं यश मिळलं आहे. प्रसिद्ध कृष्णाने सिसंदा मगाला याला शून्यावर बाद केलं. लोकेश राहुलने सोपा झेल घेत मगाला याला पव्हेलियनची वाट दाखवली. (द. आफ्रिका 287/10)

  • 23 Jan 2022 06:03 PM (IST)

    भारताला 9 व यश, डेव्हिड मिलर 39 धावांवर बाद

    भारताला 9 व यश मिळलं आहे. प्रसिद्ध कृष्णाने डेव्हिड मिलरला 39 धवांवर असताना विराट कोहलीकरवी झेसबाद केलं. (द. आफ्रिका 287/9)

  • 23 Jan 2022 06:00 PM (IST)

    द. आफ्रिकेचा 8 वा गडी माघारी, केशव महाराज 6 धवांवर बाद

    द. आफ्रिकेचा 8 वा गडी माघारी परतला आहे. जसप्रीत बुमराहने केशव महाराजला 6 धवांवर असताना विराट कोहलीकरवी झेसबाद केलं. (द. आफ्रिका 282/8)

  • 23 Jan 2022 05:56 PM (IST)

    द. आफ्रिकेचा 7 वा गडी माघारी, ड्व्हेन प्रिटोरियस 20 धवांवर बाद

    द. आफ्रिकेचा 7 वा गडी माघारी परतला आहे. प्रसिद्ध कृष्णाने ड्व्हेन प्रिटोरियसला 20 धवांवर असताना सूर्यकुमार यादवकरवी झेसबाद केलं. (द. आफ्रिका 272/7)

  • 23 Jan 2022 05:38 PM (IST)

    डेव्हिड मिलरची फटकेबाजी, द. आफ्रिका 250 पार

    डीकॉक, डुसें बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने द. आफ्रिकेच्या डावाची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. त्याने ड्वेन प्रिटोरियसच्या साथीने किल्ला लढवत 45 षटकात द. आफ्रिकेला 6 बाद 257 धावांपर्यंत मजल मारुन दिली आहे. पुढील पाच षटकात 40 ते 50 धावा जोडण्याचा निर्धार मिलरने केलेला असणार

  • 23 Jan 2022 05:01 PM (IST)

    218 धावांत द. आफ्रिकेचा निम्मा संघ बाद, सामन्यात भारताचा पुनरागमन

    सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केलं आहे. 37 व्या षटकात युजवेंद्र चहलने रॅस्सी वॅन डेर डुसें याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करत द. आफ्रिकेचा पाचवा गडी माघारी धाडला. (द. आफ्रिका 218/5)

  • 23 Jan 2022 04:53 PM (IST)

    जसप्रीत बुमराहचा द. आफ्रिकेला मोठा धक्का, क्विंटन डीकॉक 124 धावांवर बाद

    जसप्रीत बुमराहने द. आफ्रिकेला मोठा धक्का दिला आहे. त्याने शतकवीर क्विंटन डीकॉकला 124 धावांवर असताना शिखर धवनकरवी झेलबाद केलं. (द. आफ्रिका 214/4)

  • 23 Jan 2022 04:48 PM (IST)

    रॅस्सी वॅन डेर डुसेंचं अर्धशतक, द. आफ्रिका 200 पार

    सलामीवीर क्विंटन डीकॉकच्या शतकापाठोपाठ रॅस्सी वॅन डेर डुसें याने 53 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक लगावलं आहे. (द. आफ्रिका 212/3)

  • 23 Jan 2022 04:27 PM (IST)

    क्विटंन डीकॉकचं शानदार शतक, द. आफ्रिका मजबूत स्थितीत

    सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतरही द. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डीकॉकने एक बाजू लावून धरली आहे. त्याने शतकी खेळीसह द. आफ्रिकेला या सामन्यात मजबूत स्थितीन नेऊन ठेवलं आहे. डीकॉकने 108 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली आहे. (द. आफ्रिका : 30.4 षटकात 173/3)

  • 23 Jan 2022 04:15 PM (IST)

    डीकॉकचा आणखी एक षटकार

    93 धावांवर असताना डीकॉककने प्रसिद्ध कृष्णाला शानदार षटकार लगावला. तो आता शतकापासून केवळ एका धावेच्या अंतरावर आहे.

  • 23 Jan 2022 04:11 PM (IST)

    डीकॉकचा हल्लाबोल, द. आफ्रिका 150 पार

    अर्धशतकानंतर क्विंटन डीकॉकने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याने आतापर्यंत 100 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 93 धावा फटकावल्या आहेत. त्याच्या या खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने 150 धावांचा टप्पा पार केला आहे.

  • 23 Jan 2022 03:45 PM (IST)

    डीकॉकचा आणखी एक षटकार

    अर्धशतक पूर्ण केल्यानंतर सलामीवीर क्विंटन डीकॉक आणखी आक्रमक झाला आहे. त्याने 21 व्या षटकात जयंत यादवला एक षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात त्याने 12 धावा बसूल केल्या. (द. आफ्रिका : 115/3)

  • 23 Jan 2022 03:40 PM (IST)

    डीकॉकचं संयमी अर्धशतक, द. आफ्रिका 20 षटकात 100 पार

    ठराविक अंतराने एकेक गडी बाद होत असताना द. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डीकॉकने एक बाजू लावून धरली आहे. त्याने 59 चेंडूत अर्धशतक (50) पूर्ण केलं. या खेळीत त्याने आतापर्यंत 6 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. डीकॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर द. आफ्रिकेने आतापर्यंत 20 षटकांमध्ये 3 गड्यांच्या बदल्यात धावफलकावर 103 धावा झळकावल्या आहेत.

  • 23 Jan 2022 03:12 PM (IST)

    द. आफ्रिकेला तिसरा धक्का, एडन मार्क्रम 15 धावांवर बाद

    दीपक चाहरने वैयक्तिक सातव्या (डावातील 13 व्या) षटकात द. आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. एडन मार्क्रमला त्याने 15 धावांवर असताना ऋतुराज गायकवाडकरवी (सब्स्टिट्यूट फिल्डर) झेलबाद केलं. (द. आफ्रिका – 70/3)

  • 23 Jan 2022 02:37 PM (IST)

    भारताला दुसरं यश, टेम्बा बवुमा 8 धावांवर माघारी

    7 व्या षटकात द. आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. के. एल राहुलने टेम्बा बवुमा 8 धावांवर असताना धावबाद केलं. (द. आफ्रिका – 34/2)

  • 23 Jan 2022 02:25 PM (IST)

    डॉकॉकचा दीपक चाहरवर हल्लाबोल, एकाच षटकात दोन चौकार

    जानेमन मलानला बाद करणाऱ्या दीपक चाहरवर क्विंटन डॉकॉकने हल्लाबोल केला आहे. त्याने दीपकच्या दुसऱ्या षटकात दोन चौकार लगावले.

  • 23 Jan 2022 02:20 PM (IST)

    द. आफ्रिकेला पहिला धक्का, जानेमन मलान 1 धाव करुन माघारी

    दीपक चाहरने वैयक्तिक दुसऱ्या (डावातील तिसऱ्या) षटकात द. आफ्रिकेला पहिला धक्का दिला. जानेमन मलानला (01) त्याने यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. (द. आफ्रिका – 8/1)

  • 23 Jan 2022 02:06 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात

    दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाली आहे. क्विंटन डि कॉक आणि जानेमन मालान ही सलामीची जोडी मैदानात आहे. पहिल्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या बिनबाद दोन धावा झाल्या आहेत.

  • 23 Jan 2022 01:55 PM (IST)

    अश्विनला वगळलं, चाहारला संधी

    आजच्या सामन्यात काही बदल करण्यात आले आहेत. अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि वेंकटेश अय्यरला वगळण्यात आलं आहे. त्यांच्याजागी दीपक चाहार, सूर्यकुमार यादव आणि जयंत यादवला संधी दिलीय. महाराष्ट्राच्या ऋतुजराज गायकवाडला अखेर संधी नाहीच मिळाली.

  • 23 Jan 2022 01:34 PM (IST)

    टॉस जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

    भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 23 Jan 2022 01:20 PM (IST)

    संघात होऊ शकतात बदल

    तिसऱ्या वनडेसाठी संघात काही बदल अपेक्षित आहेत. वेंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार यांच्याजागी नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते.