पर्थ: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये दमदार सुरुवात केली आहे. आधी पाकिस्तान त्यानंतर नेदरलँडला हरवलं. टीम इंडियाला वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आज पर्थमध्ये टीम इंडियाची मोठी टेस्ट होणार आहे. पर्थ या जगातील सर्वात वेगवान खेळपट्टीवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेची बॉलिंग विरुद्ध भारताची बॅटिंग असा हा सामना असेल.
फार न चाललेल्या खेळाडूंना बदलणार?
टीम इंडिया आजच्या मॅचमध्ये कुठल्या प्लेइंग -11 सह उतरणार याची उत्सुक्ता आहे. टीम इंडिया पहिल्या दोन मॅचमध्ये फार न चाललेल्या खेळाडूंना बदलणार? हा प्रश्न आहे.
कुठल्या स्टेडियमवर होणार मॅच?
मेलबर्नमध्ये मागच्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या मोठ्या सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. आज पुन्हा एकदा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मॅच होणार आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर ही मॅच होईल. या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात. त्यावर सगळ्यांच लक्ष असेल.
दक्षिण आफ्रिकेकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. चेंडूला चांगला बाऊन्स देणाऱ्या खेळपट्टीचा ते फायदा उचलू शकतात. यात दोन डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत.
फलंदाजीत बदल नाही
टीम इंडिया आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करणार का? हा प्रश्न आहे. पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल चालला नव्हता. त्याच्याजागी ऋषभ पंतला संधी देणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी शनिवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक गोष्ट स्पष्ट केली. टीमला केएल राहुलवर विश्वास आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो सलामीला येईल.
दीपक हुड्डाला संधी मिळेल?
दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंग लाइनअपमध्ये क्विंटन डिकॉक, राइली रुसो आणि डेविड मिलर हे तीन आक्रमक डावखुरे फलंदाज आहेत. ते लेफ्टी असल्यामुळे अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफ स्पिन गोलंदाजीसह लोअर ऑर्डरमध्ये हुड्डा फलंदाजीसाठी चांगला पर्याय ठरु शकतो. असं होण्याची शक्यता फारच कमी आहे.
IND vs SA: संभाव्या प्लेइंग इलेवन
भारतः रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल/दीपक हुड्डा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.
दक्षिण अफ्रीकाः टेंबा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एडन मार्करम, राइली रूस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पर्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, मार्को जॅनसेन आणि एनरिख नॉर्खिया.