मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पहिला T 20 सामना सुरु आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभावी ठरले. त्यांना भारताच्या धावगतीला लगाम घालता आला नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे विशाल लक्ष्य ठेवलं आहे. भारताकडून इशान किशनने (Ishan Kishan) आज जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 48 चेंडूत 76 धावा चोपल्या. यात 11 चौकार आणि 3 षटकार होते. हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) व्हाइस कॅप्टन म्हणून छाप उमटवली. त्याने 12 चेंडूत 31 धावा फटकावल्या. आयपीएलमधला फॉर्म त्याने इथेही कायम ठेवला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. भारताकडून श्रेयस अय्यर आणि कॅप्टन ऋषभ पंतनेही उपयुक्त फलंदाजी केली. दोघांनी अनुक्रमे (36) आणि (29) धावा केल्या. त्यामुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी विशाल लक्ष्य ठेवता आला.
ऋषभला कसं ढकलल, पुढे काय घडलं ते सर्व इथे क्लिक करुन पहा
दरम्यान आज भारताच्या डावात 13 व षटक सुरु असताना, थोडा संघर्ष पहायला मिळाला. कागिसो रबाडा गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर श्रेयस अय्यरने डिफेन्सिव फटका खेळला. या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या ऋषभने क्रीझ सोडला. पण त्याचवेळी धाव पूर्ण होणार नाही हे लक्षात येताच अय्यरने मागे फिरण्यास सांगितलं. त्यावेळी धावणाऱ्या ऋषभला रबाडाने खांद्याने धक्का मारल्याचं स्पष्ट दिसत होतं.
There’s always action when Rishabh Pant is around ? pic.twitter.com/OtvmWnRjrC
— India Fantasy (@india_fantasy) June 9, 2022
त्यावेळी ऋषभने कसाबसा स्वत:चा तोल सावरला. पण आफ्रिकेच्या फिल्डर्सना रनआऊट करता आलं नाही. ऋषभला क्रीझ मध्ये पोहोण्याच्या प्रयत्नात खाली पडला. त्याला लागलं, त्यामुळे तो थोडावेळा एका पायावर बसला. त्यावेळी रबाडाने हाताने टाळी देऊन माहोल शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने जाणूनबुजून ऋषभला धक्का मारल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय.