IND vs SA T20 Series : वर्ल्ड कप नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांची T20 सीरीज झाली. या मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर सहज मात केली. आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला पहिली सीरीज T20 फॉर्मेटमध्ये खेळायची आहे. रविवारपासून टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा प्रारंभ होत आहे. T20 सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्ये सुद्धा सूर्याकडेच टीमच नेतृत्व होतं. ती मालिका भारताने 4-1 ने जिंकली होती. सूर्यकुमार कॅप्टनशिपचा तोच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण या मालिकेआधी सूर्यकुमार यादवसमोर मोठा प्रश्न आहे. एका जागेसाठी सूर्यकुमारकडे तीन पर्याय आहेत. तेच सूर्यकुमार समोरच्या अडचणीच मुख्य कारण आहे.
आता प्रश्न हा आहे की, सूर्यकुमार यादव बाहेर कोणाला बसवणार? आणि खेळवणार कोणाला?. यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तुफानी अंदाज दाखवला होता. ऋतुराज गायकवाडने सुद्धा सीरीजमध्ये शानदार फलंदाजी केली. पाच मॅचमध्ये गायकवाडने 223 धावा केल्या. यात एक शतक आणि एक अर्धशतक आहे. जैस्वालने पाच सामन्यात 138 धावा केल्या. यात एक हाफ सेंच्युरी आहे.
सूर्यकुमार कोणाला निवडणार?
दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या अडचणी वाढवल्या. याआधी सुद्धा या दोन फलंदाजांनी भारतासाठी दमदार खेळ दाखवलाय. शुभमन गिल बऱ्याच काळापासून टीम इंडियासाठी ओपनिंग करतोय. गिल सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती.
टीम मॅनेजमेंटचा विचार काय असेल?
आता प्रश्न असा आहे की, तिघांपैकी कोणाची बाजू वरचढ आहे. टीम ओपनिंगमध्ये लेफ्ट-राइट कॉम्बिनेशनला पसंती देते. टीम इंडियाचा सुद्धा हाच विचार असतो. यशस्वीला टीममध्ये स्थान मिळणं निश्चित मानलं जातय. दुसऱ्या ओपनरच्या जागेसाठी शुभमन गिलला पसंती असेल. तो फॉर्ममध्ये आहेच. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्ये विश्रांती दिल्यामुळे तो खेळला नव्हता. ऋतुराज गायकवाडला बाहेर बसवलं, तर आश्चर्य वाटू नये. टीम मॅनेजमेंट लेफ्ट-राइट कॉम्बीनेशनचा विचार न करता, फक्त फॉर्मचा विचार करत असेल, तर गिल आणि गायकवाड ओपनिंग करताना दिसू शकतात.