सेंच्युरियन: फलंदाजीमध्ये सातत्याने अपयशी ठरणाऱ्या कसोटी कर्णधार विराट कोहलीला प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी प्रेमाचा सल्ला दिला आहे. ऑफ साईडला फटके खेळण्यावर कसं नियंत्रण मिळवायचं, हे विराटने सचिन तेंडुलकरकडूनन शिकलं पाहिजे. गावस्करांनी विराटला सचिनला फोन करण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडच्या काही महिन्यात ऑफ साईडला खेळण्याच्या नादात विराट वाईट पद्धतीने बाद झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मागच्या दोन वर्षात परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संघ दमदार कामगिरी करतोय. पण विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक निघालेलं नाही. (IND VS SA Virat Kohli should call up Sachin Tendulkar and talk about curbing offside shots Sunil Gavaskar)
ऑस्ट्रेलियात काय झालं होतं?
हॅप्पी न्यू इयर करण्यासाठी विराटने सचिन फोन केला, तर ही सर्वात चांगली गोष्ट होईल. त्यावेळी होणाऱ्या चर्चेदरम्यान 2003/04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑफ साइडला फटके खेळण्यावर सचिनने कसं नियंत्रण मिळवलं, ते त्याच्याकडून विराटने समजून घ्यावं. सचिन कव्हर्स आणि यष्टीपाठी झेलबाद झाला, त्यानंतर चौथ्या सिडनी कसोटीत कव्हर्समध्ये फटका न खेळण्याचं त्याने ठरवलं. त्याने मिड-ऑफ, स्ट्रेट आणि ऑन-साइडला फटके खेळले. त्या कसोटीच्या पहिल्या डावात 241 नाबाद आणि दुसऱ्या डावात नाबाद 60 धावांची खेळी सचिनने साकारली. सचिनला हॅप्पी न्यू इयर करताना त्याने हे कसं जमवलं, ते समजून घ्याव, विराटलाही त्याचा फायदा होईल असे गावस्कर म्हणाले.
विराट एकच चूक सारखी करतोय
विराट कोहली एक मोठा खेळाडू आहे. मोठे खेळाडू चुका दुरुस्त करुन पुनरावृत्ती टाळतात. पण विराट कोहलीला मात्र हे जमत नाहीय. मागच्या तीन वर्षात विराट कोहली 11 वेळा ड्राइव्ह मारताना आऊट झालाय. विराट कोहलीकडून ही अपेक्षा नाहीय. पहिल्या डावातही लुंगी निगीडीच्या गोलंदाजीवर विराट अशाच पद्धतीने बाद झाला होता. संघाला गरज असताना विराटने चूक केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वरचढ होण्याची संधी मिळाली.
संबंधित बातम्या:
IND VS SA: सेंच्युरियनवरील विजयानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया म्हणाला….
IND VS SA: सेंच्युरियनमधील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे ‘हे’ आहेत तीन हिरो
IND VS SA: इतका राग बरा नव्हे, सिराजने बावुमाला मैदानावर फेकून मारला बॉल
(IND VS SA Virat Kohli should call up Sachin Tendulkar and talk about curbing offside shots Sunil Gavaskar)