जोहान्सबर्ग: सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. काल कसोटीच्या तिसऱ्यादिवशी भारताने शेवटची काही षटक खेळून काढण्यासाठी चेतेश्वर पुजाराच्या जागी शार्दुल ठाकूरला नाईट वॉचमन म्हणून पाठवलं. अष्टपैलू शार्दुलने शेवटची काही षटक व्यवस्थित खेळून काढली व काल दिवसअखेर भारताची 1/16 अशी स्थिती होती. शेवटच्या चेंडूवर शार्दुलने जॅनसेनला चौकारही लगावला. (IND vs SA: Was Shardul out off a no-ball? Image showing Rabada overstepping goes viral)
आज चौथ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर राबाडाच्या गोलंदाजीवर शार्दुलने 10 धावांवर असताना म्युलडरकडे झेल दिला. शार्दुल बाद झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये राबाडाने ओव्हरस्टेपिंग केल्याचा दावा करण्यात आला आहे. गोलंदाजी करताना रेषेबाहेर गोलंदाजाचा पाय गेला, तर तो नोबॉल असतो. थर्ड अंपायरने ही गोष्ट हेरली नाही, असं टि्वटर युजर्सचं म्हणणं आहे. हा फोटो आता व्हायरल होत आहे.
Great umpiring. The Shardul Thakur wicket. #INDvsSA #INDvSA #TeamIndia @BCCI pic.twitter.com/GVuBHTXwG2
— Mayuresh Chavan (@MayurChavan8491) December 29, 2021
एका युजरने हा फोटो टि्वट करताच अन्य युजर्सनी यामध्ये उडी घेतली. “थर्ड अंपायर कुठे आहे? झोपलाय का? ठाकूर नो बॉलवर आऊट झाला” असे एका टि्वटर युजरने म्हटले आहे. दुसऱ्या एका टि्वटर युजरने रबाडा सतत नो बॉल टाकत असल्याचा दावा केला आहे. कसोटीच्या पहिल्यादिवशी रबाडाने अनेकदा ओव्हरस्टेपिंग केली. आताच्या नियमानुसार थर्ड अंपायर नो बॉलचा निर्णय घेतात.
Where is 3rd umpire sleeping ? Thakur outs on no ball . #INDvsSA
— Soni Raj Singh #FarmersLivesMatter (@SRKkiSoni) December 29, 2021
काल तिसऱ्या दिवशी शार्दुलला पाठवले त्यावेळी त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. त्याने 25 चेंडू खेळून काढताना विकेट जाणार नाही, याची काळजी घेतली. 2021 मध्ये शार्दुल ठाकूरने तीन अर्धशतक झळकावली आहेत. 33.33 च्या सरासरीने त्याने 200 धावा पूर्ण केल्या आहेत.
संबंधित बातम्या:
IND vs SA : मोहम्मद शमीचं विकेट्सचं द्विशतक, अश्विन-कपिल देवसह दिग्गज गोलंदाजांना पछाडलं
IND vs SA: हेड कोच राहुल द्रविड यांना ‘घंटा’ वाजवण्याचा मान
David warner| टि्वटरवर जुन्या मालकाबरोबर डेविडचं भांडण, SRH ने दिलं कडक उत्तर
(IND vs SA: Was Shardul out off a no-ball? Image showing Rabada overstepping goes viral)