मुंबई : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात शानदार केली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना त्यांनी जिंकला आहे. सेंच्युरीयनच्या मैदानावर द. आफ्रिकन संघाला धूळ चारून भारतीय खेळाडूंनी इतिहास घडवला आहे. या मैदानावर टीम इंडियाने यापूर्वी कधीही कसोटी सामना जिंकला नव्हता. पहिल्याच धक्क्याने विराट आणि कंपनीने दक्षिण आफ्रिकेचा अभेद्य किल्ला पाडला आहे. या विजयासह भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही दूर नाही. मात्र, टीम इंडियाने याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण दक्षिण आफ्रिकेत या स्वप्नाजवळ पोहोचून नंतर मात्र निराशा झाली आहे. सध्याच्या दौऱ्यावर पहिली कसोटी जिंकल्यामुळे आगामी खेळ दिसतो तितका सोपा नाही. (IND vs SA : Winning Test series against South Africa is not easy task, Johannesburg test)
पुढचा खेळ खूप अवघड असणार आहे. आम्ही असे का म्हणतोय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला दक्षिण आफ्रिकेतील भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहावे लागेल. सेंच्युरियनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर, आता आपल्या संघाला मालिका जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र असं मानून आपण आपलीच फसवणूक करत आहोत. मालिकेत आघाडी मिळवणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ती कायम राखणे सोपे काम नाही. म्हणजेच कसोटी मालिकेचा खरा खेळ आता सुरू होणार आहे.
आता जरा दक्षिण आफ्रिकेतील भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहुया. भारताने 2006-07 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिकेचा दौरा केला होता. आणि, दुसरा दौरा जो 2010-11 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली केला होता. 2006-07 च्या दौऱ्यावर भारताने पहिला कसोटी सामना जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेतील भारताचा हा पहिला कसोटी विजय होता, जो राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली मिळवला गेला. कसोटी मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण पुढच्याच कसोटीत टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. पुढचा सामना भारताने गमावला. याचा परिणाम म्हणजे ती मालिका ड्रॉ झाली. 2010-11 मध्ये पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढची कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. याचा अर्थ सेंच्युरीयन कसोटी जिंकली म्हणजे भारत मालिका जिंकणार असा होत नाही. टीम इंडियाला मालिका जिंकायची असेल तर पुढची जोहान्सबर्ग येथे होणारी कसोटीदेखील जिंकावी लागेल. द. आफ्रिकन संघाला पुनरागमनाची संधी देणं खूप नुकसानकारक ठरू शकतं.
सेंच्युरियनमध्ये पराभूत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आपल्या संघाचा आत्मविश्वास ढासळला नसल्याचे म्हटले आहे. तो वाँडरर्समध्ये टीम इंडियाला कडवे आव्हान देईल. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा वाँडरर्समधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दक्षिण आफ्रिकेतील या मैदानावर भारताने एकही कसोटी गमावलेली नाही. मात्र, तिथे जिंकण्यापेक्षा टीम इंडियाचे सामने ड्रॉ झाले आहेत. आता जर दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी जिंकली नाही मात्र ती कसोटी अनिर्णित राहिली तर टीम इंडिया संकटात सापडू शकते. कारण, केप टाऊन कसोटी जिंकणं खूप कठीण आव्हान आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंग होऊ शकतं.
इतर बातम्या
माझ्या कहानीत खूप सारे व्हिलन, आता हरभजनसिंगच्याही टार्गेटवर बीसीसीआय, धोनीबद्दलही नाराजी?
कोहलीचे दिवस फिरलेलेच ! क्रिकेटच्या देवानेही त्याला बेस्ट टीममधून वगळलं, धोनीचं काय झालं?
Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं
(IND vs SA : Winning Test series against South Africa is not easy task, Johannesburg test)