IND vs SL 1st ODI: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वनडे सीरीज सुरु झालीय. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर पहिला वनडे सामना खेळला जात आहे. श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची पहिली बॅटिंग सुरु आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोन्ही ओपनर्सनी टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात दिली आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माने सुरुवातीपासून आक्रमक बॅटिंग करतोय. रोहितने श्रीलंकन बॉलर्सवर हल्ला चढवला. त्यांच्या गोलंदाजीची दिशा भरकटवली.
रोहित-शुभमनची आक्रमक सुरुवात
12 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या बिनबाद 80 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळतोय. रोहितने त्याच्या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितने 41 चेंडूत हाफसेंच्युरी झळकवली. शुभमन गिलने 36 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने 6 चौकार मारले. 13 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 87 धावा झाल्या आहेत. रोहित शुभमन जोडीने श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला.
Suryakumar Yadav vs KL Rahul : Choose wisely ? pic.twitter.com/U4cCGrAk2L
— UmdarTamker (@UmdarTamker) January 7, 2023
केएल राहुलवर राग
टॉस झाल्यानंतर टीम जाहीर झाली. त्यात सूर्यकुमार यादवच नाव नव्हतं. त्यामुळे अनेकांना धक्का बसला असेल. दोन दिवसांपूर्वीच राजकोटच्या मैदानात सूर्याने तुफानी शतक ठोकून टीम इंडियाला टी 20 सीरीज जिंकून दिली होती. मग अशा प्लेयरला बाहेर का बसवलं? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. टि्वटरवर सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. केएल राहुल फॉर्ममध्ये नाहीय. टीममधील त्याच्या निवडीवर नेटीझन्सनी आपला राग व्यक्त केला.