Ind vs SL: पहिल्या T20 मध्ये ‘या’ प्लेयरचा डेब्यु? रोहित शर्मासारखा धोकादायक फलंदाज

| Updated on: Jan 02, 2023 | 3:20 PM

Ind vs SL: भारत आणि श्रीलंकेमध्ये 3 जानेवारीला पहिला टी 20 सामना खेळला जाणार आहे. या मॅचमध्ये भारताकडून एक खेळाडू डेब्यु करु शकतो. हा प्लेयर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.

Ind vs SL: पहिल्या T20 मध्ये या प्लेयरचा डेब्यु? रोहित शर्मासारखा धोकादायक फलंदाज
rohit sharma
Follow us on

India vs Sri Lanka T20 Series: भारत आणि श्रीलंकेमध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे. या सीरीजचा पहिला सामना 3 जानेवारीला खेळला जाईल. या टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलला विश्रांती दिलीय. टीम इंडियाच नेतृत्व हार्दिक पंड्याच्या हाती आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली एका स्टार खेळाडूला डेब्युची संधी मिळू शकते. हा खेळाडू स्फोटक फलंदाजी करु शकतो. जाणून घेऊया या प्लेयरबद्दल.

हा खेळाडू करु शकतो डेब्यु?

श्रीलंकेविरुद्ध हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली शुभमन गिलला भारताकडून संधी मिळू शकते. संधी मिळाल्यास शुभमन गिलचा हा डेब्यु ठरेल. गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याला न्यूझीलंड विरुद्ध सीरीजमध्येही संधी मिळाली होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. गिल फॉर्ममध्ये असेल, तर तो कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाची वाट लावू शकतो.

टेस्ट मॅचमध्ये दाखवलाय जलवा

शुभमन गिलने टेस्ट आणि वनडेमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलाय. काही क्रिकेट तज्ज्ञांच्या मते हा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीसारखी बॅटिंग करतो. प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची धार बोथट करण्यासाठी त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचे फटके आहेत.

रोहित शर्मा सारखी करतो फलंदाजी

शुभमन गिल रोहित शर्मासारखी बॅटिंग करतो. 23 वर्षाचा गिल एकदा क्रीजवर टीकला, तर तो मोठी इनिंग खेळू शकतो. IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून त्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. गिलने भारताकडून खेळताना 13 टेस्ट मॅचमध्ये 736 धावा आणि 15 वनडे सामन्यात 687 रन्स केल्यात.