लखनऊ: वेस्ट इंडिज विरुद्ध क्लीन स्वीप विजयानंतर भारतीय संघ आजपासून श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka T20I Series) तीन टी 20 सामन्याची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. लखनऊच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर पहिला सामना होत आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियासाठी ऑलराऊंडर दीपक हुड्डा (Deepak Hooda) आजच्या सामन्यात डेब्यु करत आहे. दीपक हुड्डाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत वनडेमध्ये डेब्यू केला होता. तिथे त्याने चांगला खेळ दाखवला होता. त्यानंतर बऱ्ंयाच कालावधीनंतर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) प्लेइंग इलेवनमध्ये खेळताना दिसणार आहे.
टीम इंडियाने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेवनमध्ये मोठे बदल केले आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध 20 फेब्रुवारीला खेळलेल्या टीमममध्ये सहा बदल केले आहेत. यात दोन महत्त्वाचे बदल म्हणजे दीपक हुड्डाचा डेब्यू आणि संजू सॅमसनचे पुनरागमन आहे. सॅमसन श्रीलंकेविरुद्धच जुलै 2021 मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा टी 20 सामना खेळला होता. या दोघांशिवाय मोठ्या ब्रेकनंतर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा सुद्धा संघाचा भाग आहेत.
जाडेजा आता दुखापतीमधून पूर्णपणे सावरला आहे. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून संधीच्या प्रतिक्षेत असलेल्या ऋतुराजला वेस्ट इंडिज विरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात संधी मिळाली होती. पण त्याला प्रभावी कामगिरी करता आला नव्हती. आजच्या सामन्यात दुखापतीमुळे तो खेळत नाहीय.
IND vs SL: आजच्या सामन्याची प्लेइंग इलेवन
भारतः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सैमसन, दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.
श्रीलंकाः दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असालंका, जनित लियानगे, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), चामिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, जैफरी वांडरसे, प्रवीण जयाविक्रमा, लाहिरू कुमारा