मुंबई: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) त्याच्या करीयरमधील आज 100 वा कसोटी सामना खेळत आहे. विराटसाठी हा सामना खूप खास आहे. कारण 100 व्या कसोटीपर्यंत (100th Test match) पोहोचताना त्याने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. सध्या विराटचा पडता काळ सुरु आहे. त्याच्यावर टीका होतेय. मागच्या अडीचवर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाही. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहते विराटच्या शतकाच्या (Century) प्रतिक्षेत आहेत. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 70 शतकं झळकावली आहेत. यात 43 शतकं वनडेमध्ये तर 27 शतकं कसोटीमध्ये झळकावली आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळताना कामगिरीत सातत्य ठेवणं, सोपं नाहीय. पण विराटने प्रचंड मेहनतीने हे साध्य करुन दाखवलं आहे.
विराटला आज सन्मानित करण्यात आलं
100 व्या कसोटीआधी विराट कोहलीला आज बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आलं. हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटच कौतुक करताना त्याला मानचिन्ह प्रदान केलं. विराटने देखील सर्वांचे आभार मानले. यावेळी पत्नी अनुष्का शर्मा सुद्धा विराटसोबत मैदानावर उपस्थित होती.
#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022
राहुल द्रविडकडून स्पेशल कॅप घेतल्यानंतर विराट म्हणाला…
“मी बीसीसीआयचे आभार मानतो. माझ्या बालपणीच्या हिरोकडून आज मी 100 व्या कसोटीची कॅप घेतली. हे खूप सुंदर आहे” असं विराट म्हणाला. “हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझी पत्नी, माझा भाऊ, माझं कुटुंब इथे उपस्थित आहे. त्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. क्रिकेट हा एक टीम गेम आहे. तुमच्या सर्वांशिवाय हे शक्य नव्हतं. आयपीएल आणि तिन्ही फॉर्मेटमध्ये आम्ही जितक्या प्रमाणात क्रिकेट खेळतोय, ते पाहता पुढच्यापिढीने माझ्याकडून मी क्रिकेटच्या एका अस्सल फॉर्मेटमध्ये 100 सामने खेळलो ही प्रेरणा घ्यावी, असं विराटने सांगितलं.