कोलकाता: टीम इंडियाने गुवाहाटी येथील श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकला. या मॅचआधी टीम इंडियाने संघ जाहीर केला, त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. सोशल मीडियावर या सिलेक्शनचे पडसाद उमटले होते. या टीममध्ये असा एक प्लेयर आहे, ज्याच्या निवडीवर सातत्याने प्रश्न निर्माण होतोय. या खेळाडूच नाव आहे केएल राहुल. मागच्या काही काळापासून केएल राहुल खराब फॉर्मचा सामना करतोय. त्याला बरेचदा संधी दिलीय. पण त्याच्या परफॉर्मन्समध्ये फरक पडलेला नाही. सातत्याने तो फ्लॉप ठरतोय.
हाच न्याय का लावला जात नाही?
केएल राहुल इतका अपयशी ठरुनही, त्याला टीममध्ये का खेळवताय? असा प्रश्न विचारला जातोय. इथे संजू सॅमसनसारख्या स्फोटक फलंदाजाला संधीसाठी प्रतिक्षा करावी लागते. इशान किशन डबल सेंच्युरी मारुनही टीमच्याबाहेर आहे. मग केएल राहुलला हाच न्याय का लावला जात नाही? असा प्रश्न आहे.
सिलेक्टर्सचा संयम सुटत चाललाय
केएल राहुलवर आता सिलेक्टर्सही फार खूश नाहीयत. राहुलच्या कामगिरीत सातत्य नाहीय. त्यामुळे सिलेक्टर्सचा संयम सुटत चाललाय. श्रीलंकेविरुद्ध चालू असलेली वनडे मालिका ही केएल राहुलसाठी शेवटची संधी आहे. या सीरीजमध्ये त्याला प्रभाव पाडता आला नाही, तर कदाचित पुढे त्याचा विचार होणार नाही. इनसाइड स्पोर्ट् भारतीय क्रिकेटमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलय.
तो सतत टीमच्या आत-बाहेर होत राहिलाय
“केएल राहुलवर सध्या प्रचंड दबाव आहे. तो टॅलेंटेड आहे, यात अजिबात शंका नाही. पण त्याचवेळी त्याच्या कामगिरीत सातत्य नाहीय. सिलेक्टर्सचा संयम सुटत चाललाय. त्याला टीम मॅनेजमेंटचा पाठिंबा आहे. पण चालू सीरीजमध्ये त्याने धावा केल्या नाहीत, तर सर्वकाही बदलून जाईल. त्याला हा पाठिंबा मिळणार नाही” असं भारतीय टीम मॅनेजमेंटच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं. मागच्या वर्ष-दीडवर्षांपासून केएल राहुल छाप उमटवणारी कामगिरी करु शकलेला नाही. बॅटिंगची सरासरी, कधी फिटनेस यामुळे तो सतत टीमच्या आत-बाहेर होत राहिलाय.