India vs Sri Lanka 2nd T20 Series: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिला टी 20 सामना जिंकला. निसटता विजय मिळवून टीम इंडियाने नववर्षाची चांगली सुरुवात केली. टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये आज दुसरा टी 20 सामना खेळला जाईल. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा एक स्टार प्लेयर दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पण आता हा प्लेयर फिट झालाय. तो दुसऱ्या टी 20 सामन्यात खेळू शकतो. जाणून घेऊया, त्या प्लेयरबद्दल.
हा खेळाडू फिट
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहला ताप आला होता. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात तो खेळू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार अर्शदीप सिंह आता फिट झालाय. दुसरा टी 20 सामना खेळण्यासाठी तयार आहे. अर्शदीप सिंह प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला, तर बाहेर कोणाला बसवायच? हा प्रश्न असेल. शिवम मावी आणि उमरान मलिकने पहिल्या टी 20 सामन्यात चांगली कामगिरी केली. कदाचित हर्षल पटेलला टीममधील आपलं स्थान गमवावं लागेल.
….म्हणून तो घातक गोलंदाज
अर्शदीप सिंह घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या बळावर टीम इंडियाला काही मॅच जिंकून दिल्या आहेत. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये तो आपल्या स्विंगने प्रतिस्पर्धी टीमला धक्के देऊ शकतो. डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता आहे. डावाच्या सुरुवातीला आणि अखेरीस तो उपयुक्त गोलंदाजी करु शकतो.
टी20 वर्ल्ड कपमध्ये कमालीच प्रदर्शन
अर्शदीप सिंहने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये कमालीच प्रदर्शन केलं. त्याने शानदार कामगिरी केली. टीम इंडियासाठी तो मॅच विनर ठरला. टी 20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये त्याने 10 विकेट काढल्या होत्या.