Umran Malik : उमरानची धार, श्रीलंका लाचार, 147 किमी वेगाने असा उडवला स्टंप, व्हीडिओ पाहाच

| Updated on: Jan 05, 2023 | 11:32 PM

उमरान मलिकने (Umran Malik) श्रीलंकेच्या डावातील 10 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर वायूवेगाने बॉल टाकत भानुकाचा स्टंपचं उडवला.

Umran Malik : उमरानची धार, श्रीलंका लाचार, 147 किमी वेगाने असा उडवला स्टंप, व्हीडिओ पाहाच
Follow us on

पुणे : जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात 4 ओव्हरमध्ये 48 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. उमरानने भानुका राजपक्षा, असालंका आणि वानिंदू हसरांगा या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र या 3 विकेट्सपैकी सर्वात जास्त चर्चा झाली ती राजपक्षाच्या विकेटची. उमरानने कसला बोल्ड केलाय राजपक्षाला, कडक. (ind vs sl 2nd t20i umran malik sensetional dismiss to bhanuka rajpaksha 147 kmph video viral on social media at mca pune)

उमरानने पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या. मात्र त्यानंतर आपल्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकायला आला तेव्हा त्याने चमत्कार दाखवून दिला. उमरानने श्रीलंकेच्या डावातील 10 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर वायूवेगाने बॉल टाकत भानुकाचा स्टंपचं उडवला.

हे सुद्धा वाचा

राउंड द विकेट बॉलिंग टाकणाऱ्या उमरानने 147 किमी वेगाने हा हॉल टाकला, जो राजपक्षाला दिसलाही नाही. उमरानने टाकलेला बॉल भानुकाच्या बॅटला साधारण स्पर्थ करत थेट स्टंपला जाऊन धडकला. बीसीसीआयने हा व्हीडिओ ट्विट केला आहे.

दरम्यान उमरानने 3 जानेवारीला श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 155 च्या स्पीडने बॉल टाकला होता. उमरान यासह सर्वात जास्त स्पीडने बॉल टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

दुसऱ्या टी 20 साठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेईंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, भानुका राजपक्षे, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.