IND vs SL, 2nd Test, Day 3,: भारताने दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

| Updated on: Mar 14, 2022 | 6:19 PM

भारताने दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेच्या संघाला दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 447 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 28 धावांपर्यंत मजल मारली आहे.

IND vs SL, 2nd Test, Day 3,: भारताने दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
Follow us on

बंगळुरु: पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीचाही टीम इंडियाने (Team India) तीन दिवसात निकाल लावला आहे. भारताने दिलेल्या 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा (India vs srilanka test) दुसरा डाव 208 धावात संपुष्टात आला. भारताने हा कसोटी सामना 238 धावांनी जिंकला. मोहाली कसोटीत (Mohali Test) टीम इंडियाने डावाने विजय मिळवला होता. दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. दुसऱ्याडावात श्रीलंकेकडून कॅप्टन दिमुथ करुणारत्नेने एकाकी झुंज दिली. त्याने 107 धावांची शतकी खेळी साकारली. जसप्रीत बुमरहाने त्याचा अडसर दूर केला. बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्याडावात फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरली. अश्विन, जाडेजा आणि अक्षर पटेलने मिळून सात विकेट घेतल्या. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्य़ा डावातही जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. त्याने तीन विकेट घेतल्या.

भारताची Playing 11

रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल

श्रीलंकेची Playing 11

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुस मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, प्रवीण जयविक्रमा, विश्वा फर्नांडो

Key Events

बुमराहचा ‘पंच’

श्रीलंकेच्या पहिल्या डावात जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेत श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला. बुमराहने पहिल्यांदाच भारतात एका डावात 5 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. 29 कसोटीत त्याने आतापर्यंत 8 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

अय्यरची दोन्ही डावात अर्धशतकं

गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर श्रेयस अय्यरने दोन्ही डावात उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 98 चेंडूत 92 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने 87 चेंडूत 67 धावांची खेळी करुन भारताला 300 पार नेलं. पिंक बॉल टेस्टमध्ये दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारा श्रेयस पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 14 Mar 2022 05:49 PM (IST)

    भारताने दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली

    श्रीलंकेचा दुसरा डाव 208 धावांवर संपुष्टात आला आहे. भारताने 238 धावांनी दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. भारताने मालिक 2-0 अशी जिंकली.

  • 14 Mar 2022 05:42 PM (IST)

    श्रीलंकेचा 9 वा गडी माघारी, सुरंग लकमल बाद

    जसप्रीत बुमराने भारताला 9 वी विकेट मिळवून दिली आहे. त्याने सुरंग लकमल (1) याला त्रिफळाचित केलं. भारत आता विजयापासून केवळ एक पावलं दूर आहे. (श्रीलंका 208/9)


  • 14 Mar 2022 05:40 PM (IST)

    भारताला 8 वं यश, लसिथ एम्बुलडेनिया 2 धावांवर बाद

    रवीचंद्रन अश्विनने भारताला 8 वी विकेट मिळवून दिली आहे. त्याने लसिथ एम्बुलडेनियाला पायचित पकडून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारत आता विजयापासून दोन पावलं दूर आहे. (श्रीलंका 206/8)

  • 14 Mar 2022 05:31 PM (IST)

    भारताला मोठं यश, शतकवीर दिमुथ करुणारत्ने बाद

    जसप्रीत बुमराहने भारताला मोठं यश मिळवून दिलं आहे. त्याने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेचा अडथळा दूर केला आहे. बुमराहने करुणारत्नेला 107 धावांवर असताना पायचित पकडलं. (श्रीलंका 204/7)

  • 14 Mar 2022 05:19 PM (IST)

    कॅप्टन करुणारत्नेचं शानदार शतक

    श्रीलंकेचा कॅप्टन दिमुथ करुणारत्नेने शानदार शतक झळकावलं आहे. तो 107 धावांवर खेळतोय. श्रीलंकेच्या दोनशे धावा पूर्ण झाल्या आहेत.

  • 14 Mar 2022 05:03 PM (IST)

    श्रीलंकेची सहावी विकेट

    श्रीलंकेचा कॅप्टन दिमुथ करुणारत्ने एकाबाजूने दमदार फलंदाजी करतोय. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळत नाहीय. चरिथ असालंकाला पाच धावांवर अक्षर पटेलने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. श्रीलंकेच्या सहा बाद 183 धावा झाल्या आहेत. करुणारत्ने 90 धावांवर नाबाद आहे.

  • 14 Mar 2022 04:39 PM (IST)

    श्रीलंकेला पाचवा धक्का

    करुणारत्ने आणि डिकवेलाची जोडी अक्षर पटेलने फोडली. त्याने डिकवेलाला 12 धावांवर पंतकरवी यष्टीचीत केलं. श्रीलंकेची पाच बाद 164 धावा अशी स्थिती आहे.

  • 14 Mar 2022 04:09 PM (IST)

    दिमुथ करुणारत्नेची झुंजार फलंदाजी

    पहिल्या सत्राचा खेळ संपला असून श्रीलंकेच्या चार बाद 151 धावा झाल्या आहेत. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने झुंजार फलंदाजी करताना 67 धावा केल्या आहेत. श्रीलंकेला अजून विजयासाठी 296 धावांची आवश्यकता आहे. आज पहिल्या सत्रात तीन विकेट गेल्या आहेत.

  • 14 Mar 2022 03:22 PM (IST)

    श्रीलंकेची चौथी विकेट

    धनंजय डि सिलव्हाच्या रुपाने श्रीलंकेला चौथा धक्का बसला आहे. अश्विनने डि सिलव्हाला चार धावांवर विहारीकरवी झेलबाद केलं. श्रीलंकेची अवस्था चार बाद 110 झाली आहे.

  • 14 Mar 2022 02:55 PM (IST)

    श्रीलंकेला तिसरा धक्का

    कुशल मेंडीसपाठोपाठ मॅथ्यूजही बाद झाला. रवींद्र जाडेजाने त्याला क्लीन बोल्ड केलं. आल्यापावली मॅथ्यूज तंबूत परतला. त्याने अवघी एक धाव केली. श्रीलंकेची अवस्था तीन बाद 98 झाली आहे.

  • 14 Mar 2022 02:51 PM (IST)

    श्रीलंकेला दुसरा धक्का, अश्विनने फोडली जोडी

    अर्धशतक झळकावल्यानंतर कुशल मेंडीस बाद झाला. अश्विनच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याला यष्टीचीत केलं. मेंडीसने 54 धावा केल्या. श्रीलंकेच्या दोन बाद 97 धावा झाल्या आहेत.

  • 14 Mar 2022 02:36 PM (IST)

    करुणारत्ने-मेंडीसची जोडी जमली

    दिमुथ करुणारत्ने आणि कुशल मेंडीस भारतीय गोलंदाजांचा चांगल्या पद्धतीने सामना करत आहेत. करुणारत्ने 35 आणि मेंडीस 38 धावांवर खेळतोय. श्रीलंकेच्या एक बाद 79 धावा झाल्या आहेत.

  • 14 Mar 2022 02:36 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

    सावनेरच्या माताखेडी परिसरातील घटना

    युवक आणि युवतीने वेगवेगळ्या ठिकाणी केली आत्महत्या

    प्रेम प्रकरणातून आत्महत्या झाल्याची चर्चा

  • 14 Mar 2022 02:16 PM (IST)

    श्रीलंकेच्या 50 धावा पूर्ण

    बंगळुरुत दुसरा कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेच्या एक बाद 50 धावा झाल्या आहेत. कॅप्टन करुणारत्ने (20) आणि मेंडीस (24) धावांवर खेळतोय.

  • 14 Mar 2022 01:11 PM (IST)

    भारत विजयापासून 9 ‘पावलं’ दूर

    447 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 28 धावांपर्यंत मजल मारली आहे. उर्वरित तीन दिवसात श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे.