IND vs SL 3rd ODI: दुसऱ्या सामन्याच्या मॅचविनरलाच ड्रॉप करणार? अशी असेल टीम इंडियाची Playing 11

| Updated on: Jan 15, 2023 | 8:40 AM

IND vs SL 3rd ODI: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात फार बदल होण्याची शक्यता नाहीय. जास्तीत जास्त श्रेयस अय्यरला आराम देऊन सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते.

IND vs SL 3rd ODI: दुसऱ्या सामन्याच्या मॅचविनरलाच ड्रॉप करणार? अशी असेल टीम इंडियाची Playing 11
Follow us on

तिरुअनंतपूरम: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या दोन मालिकांसाठी कोणाला संधी मिळाली पाहिजे? त्यावरुन अजूनही चर्चा सुरु आहे. ज्यांना संधी मिळाली, तो योग्य निर्णय होता का? या प्रश्नांवर अजूनही वादविवाद सुरु आहेत. दरम्यान आज टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये वनडे सीरीजचा तिसरा सामना होणार आहे. तिरुवनंतपुरम येथे तिसरा सामना खेळला जाईल. टीम इंडियाने सीरीज आधीच खिशात घातली आहे. आता ते टीममध्ये काही बदल करतात की, नाही? यावर सगळ्यांच्या नजरा असतील.

त्याने संधीच केलं सोन

टीम इंडियाने गुवाहाटीमध्ये पहिला आणि कोलकाता येथे दुसरा वनडे सामना जिंकून सीरीज आधीच जिंकली आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये फक्त एक बदल करण्यात आला होता. लेग स्पिनर युजवेंद्र चहलला दुखापत झाली होती. त्यामुळे कोलकाता वनडेमध्ये चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळाली. कुलदीपने 3 विकेट घेऊन तो निर्णय योग्य ठरवला. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.

मॅन ऑफ द मॅच मिळवूनही ड्रॉप

कुलदीप यादव बांग्लादेश दौऱ्यातही पहिल्या टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला होता. मात्र तरीही त्याला पुढच्या टेस्टमध्ये टीममधून ड्रॉप करण्यात आलं. त्यावरुन सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. टीम मॅनेजमेंटवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता युजवेंद्र चहल फिट झाल्यामुळे पुन्हा कुलदीपला ड्रॉप करणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांनकडून विचारला जातोय. टीम इंडियात आतापर्यंत कुलदीपच्या बाबतीत बरेच उलट-सुलट निर्णय झालेत. त्यामुळे कुलदीपला ड्रॉप करण्याची भिती व्यक्त केली जातेय.

टीमसमोर हा मोठा प्रश्न

कुलदीपनंतर आता इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला संधी मिळणार? हा प्रश्न आहे. सीरीजच्या पहिल्या दोन मॅचमध्ये या दोघांना संधी मिळाली नाही, त्यावरुन बरेच वादविवाद झाले. ज्या खेळाडूंना या दोघांच्या जागी संधी मिळाली, त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. आता टीम इंडिया सीरीज जिंकलीय. त्यामुळे या दोघांना संधी मिळेल का? हा प्रश्न आहे.

‘या’ खेळाडूला वगळलं जाऊ शकतं

तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात फार बदल होण्याची शक्यता नाहीय. जास्तीत जास्त श्रेयस अय्यरला आराम देऊन सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. विराट कोहली मागच्या सामन्यात लवकर बाद झाला होता. पण त्याला वगळणार नाही. त्याने सीरीजच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकलं होतं.

मोहम्मद शमीला आराम?

गोलंदाजीत एक बदल निश्चिच दिसतोय. दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आराम दिला जाऊ शकतो. त्याच्याजागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला संधी मिळू शकते. शमी पहिल्या दोन सामन्यात विशेष प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरीज हे सुद्धा शमीला आराम देण्यामागे एक कारण आहे. त्याशिवाय फार बदल होणार नाहीत.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेवन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.