IND vs SL 1st Test: रोहितने श्रेयस बरोबर न्याय केला, योग्य संघ निवडला, मिशन मोहालीसाठी अशी आहे प्लेइंग XI

| Updated on: Mar 04, 2022 | 9:37 AM

IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंकेमध्ये आज पहिला कसोटी (Ind vs Sl 1st Test) सामना होत आहे. मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतासाठी हा कसोटी सामना विशेष आहे.

IND vs SL 1st Test: रोहितने श्रेयस बरोबर न्याय केला, योग्य संघ निवडला, मिशन मोहालीसाठी अशी आहे प्लेइंग XI
भारत-श्रीलंकेमध्ये पहिली कसोटी
Image Credit source: bcci
Follow us on

चंदीगड: भारत आणि श्रीलंकेमध्ये आज पहिला कसोटी (Ind vs Sl 1st Test) सामना होत आहे. मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतासाठी हा कसोटी सामना विशेष आहे. कारण विराट कोहलीचा (Virat kohli) हा 100 वा कसोटी सामना, तर रोहित शर्माचा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून हा पहिलाच कसोटी सामना आहे. कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देणारा विराट 100 वी कसोटी संस्मरणीय करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेवन जाहीर केली आहे. भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरला आहे. यात तीन फिरकी गोलंदाज आहेत. श्रीलंकेच्या संघाचा हा 300 वा कसोटी सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर रोहितने विराटसाठी ही स्पेशल टेस्ट असल्याचं सांगितलं. फारच कमी क्रिकेटपटू 100 कसोटी सामने खेळतात.

रोहित शर्मा आजच्या कसोटीसाठी काय संघ निवडणार याची उत्सुक्ता होती. कारण मधल्याफळीतल्या दोन जागांसाठी तिघांमध्ये चुरस होती. त्यामुळे रोहित कोणाला निवडतो? त्याची उत्सुक्ता होती. पूजारा-रहाणे नसल्यामुळे त्यांच्याजागी हनुमा विहारी, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या तिघांमध्ये स्पर्धा होती. पूजारा आणि रहाणे ज्या क्रमांकावर खेळायचे, त्या ठिकाणी शुभमन गिल आणि हनुमा विहारीला संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती.

शॉट सिलेक्शनचा विचार केल्यास शुभमन गिल रहाणेसारखी फलंदाजी करु शकतो. शुभमन गिलसाठी हे घरचं मैदान असल्यामुळे त्याला संधी मिळेल असं बोललं जात होतं. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरला बाहेर बसावं लागलं असतं. पण रोहितने आज संघ निवडताना श्रेयस अय्यरला संधी दिली. नुकत्याच श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याने तीन नाबाद अर्धशतक झळकावली आहेत. त्याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणातही श्रेयसने शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे श्रेयसला ड्रॉप करणं त्याच्यावर अन्याय ठरला असता. पण रोहितने एकदम योग्य संघ निवडला आहे.

भारताची प्लेइंग XI: रोहित शर्मा, (कर्णधार) मयंक अग्रवाल, विराट कोहली, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अश्विन, जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह