IND vs SL, 1st Test, Day 1 Live Score: दिवसअखेर भारताची 6 बाद 357 धावांपर्यंत मजल, जाडेजा-अश्विन मैदानात

| Updated on: Mar 04, 2022 | 7:02 PM

Ind Vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. मोहालीमध्ये पहिला कसोटी सामना होत आहे. टी-20 मालिकेतील दारुण पराभवानंतर पहिला विजय मिळवण्याचा श्रीलंकन संघाचा प्रयत्न असेल.

IND vs SL, 1st Test, Day 1 Live Score: दिवसअखेर भारताची 6 बाद 357 धावांपर्यंत मजल, जाडेजा-अश्विन मैदानात
Follow us on

Ind Vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. मोहालीमध्ये पहिला कसोटी सामना होत आहे. टी-20 मालिकेतील दारुण पराभवानंतर पहिला विजय मिळवण्याचा श्रीलंकन संघाचा प्रयत्न असेल. भारतासाठी हा कसोटी सामना खास आहे. कारण विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना आहे, तर रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून डेब्यू. त्यामुळे विजय मिळवून या कसोटीला संस्मरणीय करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

Key Events

विराटच्या 71 व्या शतकाचं स्वप्न अपूर्णच

100 वा कसोटी सामना खेळणारा विराट कोहली 45 धावांवर आऊट झाला. एमबुलडेनियाने त्याला क्लीन बोल्ड केलं.

भारत-श्रीलंकेमधील मागच्या 10 कसोटी सामन्यातील स्थिती

मागच्या 10 कसोटी सामन्यांवर नजर टाकली तर भारताची बाजू वरचढ आहे. भारत 7-1 ने आघाडीवर आहे. दोन कसोटी सामने ड्रॉ झालेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 04 Mar 2022 06:48 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवस पुणे दौऱ्यावर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवस पुणे दौऱ्यावर

    7 ते 10 तारखेपर्यंत करणार पुण्याचा दौरा

    8 तारखेला पक्षाच्या विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

    9 तारखेला पुण्यात मनसेचा वर्धापन दिन

    10 तारखेला पिंपरी चिंचवडचा करणार दौरा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवस पुण्यात तळ ठोकणार

    महापालिका निवडणुक राज ठाकरेंच लक्ष्य !

  • 04 Mar 2022 05:03 PM (IST)

    दिवसअखेर भारताची 6 बाद 357 धावांपर्यंत मजल, जाडेजा-अश्विन मैदानात

    दिवसअखेर भारताने 6 बाद 357 धावांपर्यंत मजल मारली आहे. रवींद्र जाडेजा (45) आणि रवी. अश्विन (10) धावांवर खेळत आहेत. आजचा दिवस यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने गाजवला त्याने. 97 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 96 धावा फटकाल्या. तर हनुमा विहारी 58 धावांवर बाद झाला.


  • 04 Mar 2022 04:43 PM (IST)

    अवघ्या 4 धावांनी ऋषभ पंतचं शतक हुकलं, 332 धावांवर भारताचा 6 वा गडी माघारी

    तुफानी फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतला रोखण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश मिळालं आहे. जलदगती गोलंदाज सुरंगा लकमलने पंतला 96 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. पंतने 97 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 96 धावा फटकाल्या.

  • 04 Mar 2022 04:27 PM (IST)

    पंतचे सलग दोन चौकार

    डी सिल्वाने 79 वे षटक टाकलं, ज्यामध्ये त्याने 12 धावा दिल्या. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर पंतने मिड-विकेटवर चौकार वसूल केला, तर पुढच्या चेंडूवर त्याने आणखी एक चौकार लगावला. पंत आता शतकाच्या जवळ पोहोचला आहे.

  • 04 Mar 2022 04:17 PM (IST)

    ऋषभ पंतची वनडे स्टाइल बॅटिंग

    ऋषभ पंतची वनडे स्टाइल बॅटिंग. भारताने 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऋषभ पंत 82 आणि जाडेजा 27 धावांवर खेळतोय.

  • 04 Mar 2022 04:01 PM (IST)

    ऋषभ पंतची शानदार हाफ सेंच्युरी

    ऋषभ पंतने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. जाडेजा 22 धावांवर खेळतोय. भारताच्या पाचबाद 272 धावा झाल्या आहेत. अर्धशतकी खेळीत पंतने चार चौकार आणि एक षटकार लगावला.

  • 04 Mar 2022 03:50 PM (IST)

    भारताने ओलांडला 250 धावांचा टप्पा

    भारताने अडीचशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या पाच बाद 266 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत अर्धशतकाच्या जवळ आहे. रवींद्र जाडेजा 18 धावांवर त्याला साथ देत आहे.

  • 04 Mar 2022 03:16 PM (IST)

    भारताला पाचवा धक्का, रवींद्र जाडेजा मैदानात

    भारताच्या पाच बाद 234 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 27 धावांवर आऊट झाला. पंत 33 धावांवर खेळतोय. त्याची साथ द्यायला रवींद्र जाडेजा मैदानात आला आहे.

  • 04 Mar 2022 02:51 PM (IST)

    ऋषभ-श्रेयसची जमली जोडी, भारताची धावसंख्या 200 च्या पुढे

    भारताने 200 धावांचा टप्पा पार केला आहे. 58 षटकात भारताच्या चार बाद 216 धावा झाल्या आहेत. ऋषभ 22 आणि श्रेयस 21 धावांवर खेळतोय.

  • 04 Mar 2022 02:15 PM (IST)

    भारताच्या चार बाद 199 धावा

    दुसऱ्या सत्राचा खेळ संपला असून 53 षटकात भारताच्या चार बाद 199 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 12 आणि श्रेयस अय्यर 14 धावांवर खेळतो.

  • 04 Mar 2022 01:46 PM (IST)

    भारताला चौथा धक्का

    विराट कोहली बाद झाल्यानंतर भारताला चौथा धक्का बसला आहे. हनुमा विहारी 58 धावांवर आऊट झाला. त्याला फर्नाडोने क्लीन बोल्ड केलं. भारताच्या चार बाद 181 धावा झाल्या आहेत.

  • 04 Mar 2022 01:30 PM (IST)

    शतकाचं स्वप्न भंगल, विराट कोहली क्लीन बोल्ड

    भारताला मोठा धक्का बसला आहे. 100 वा कसोटी सामना खेळणारा विराट कोहली 45 धावांवर बाद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज एमबुलडेनिया एका अप्रतिम चेंडूवर विराटला क्लीन बोल्ड केलं. विराटकडून आज 71 व्या शतकाची अपेक्षा होती.

  • 04 Mar 2022 01:15 PM (IST)

    विराट-हनुमा विहारी जोडी जमली

    41 षटकात भारताच्या दोन बाद 162 धावा झाल्या आहेत. हनुमा विहारी 54 आणि विराट कोहली 40 धावांवर खेळतोय

  • 04 Mar 2022 12:58 PM (IST)

    विहारी-विराटची दमदार फलंदाजी

    भारताची दमदार फलंदाजी सुरु आहे. विराट कोहली आणि हनुमा विहारीचा जोडी श्रीलंकेच्या गोलंदाजांना दाद देत नाहीय. विहारीने शानदार अर्धशतक झळकवलय. भारताच्या दोन बाद 155 धावा झाल्या आहेत. हनुमा विहारी 52 आणि विराट कोहली 36 धावांवर खेळतोय. विहारीने पाच आणि कोहलीने चार चौकार लगावले आहेत.

  • 04 Mar 2022 12:19 PM (IST)

    लंचनंतर खेळाला सुरुवात

    28 षटकात भारताच्या दोन बाद 117 धावा झाल्या आहेत. विराट 19 आणि विहारी 34 धावांवर खेळतोय. विराटने या षटकात सुरेश चौकार लगावला.

  • 04 Mar 2022 11:51 AM (IST)

    लंचपर्यंत भारताच्या दोन बाद 109 धावा

    भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्यादिवशी लंचपर्यंत पहिल्याडावात दोन बाद 109 धावा केल्या आहेत. हनुमा विहारी 30 तर विराट कोहली 15 धावांवर खेळतोय.

  • 04 Mar 2022 11:21 AM (IST)

    भारताचे धावांचे शतक पूर्ण

    23 व्या षटकात भारताने धावांचे शतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली सात आणि हनुमा विहारी 29 धावांवर खेळत आहे.

  • 04 Mar 2022 11:03 AM (IST)

    मयंक आऊट, विराट मैदानात

    मयंक अग्रवाल आऊट झाला आहे. 33 धावांवर त्याला एमबुलडेनिया पायचीत पकडलं. विराट कोहली मैदानात आला आहे. त्याचा हा 100 वा कसोटी सामना आहे.

  • 04 Mar 2022 11:01 AM (IST)

    भारताची दमदार फलंदाजी

    श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची दमदार फलंदाजी सुरु आहे. 18 षटकात भारताच्या एकबाद 80 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 33 आणि हनुमा विहारी 16 धावांवर खेळतोय.

  • 04 Mar 2022 10:27 AM (IST)

    भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

    भारताच्या दहा षटकात एकबाद 53 धावा झाल्या आहेत. दमदार फलंदाजी करणारा कॅप्टन रोहित शर्मा 29 धावांवर आऊट झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने कुमाराच्या गोलंदाजीवर लकमलकडे झेल दिला. मयंक अग्रवाल 21 आणि हनुमा विहारी एक रन्सवर खेळत आहे. रोहितने त्याच्या खेळीत सहा चौकार लगावले.

  • 04 Mar 2022 09:57 AM (IST)

    भारताची सावध सुरुवात

    भारताने सावध सुरुवात केली आहे. पहिल्या पाच षटकात भारताच्या बिनबाद 23 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 13 आणि रोहित शर्मा 9 धावांवर खेळतोय. मयंकने तीन तर रोहितने दोन चौकार लगावले आहे.

  • 04 Mar 2022 09:42 AM (IST)

    भारताच्या डावाला सुरुवात

    भारत-श्रीलंकेमध्ये कसोटी सामना सुरु झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालची जोडी मैदानात आहे. दोन षटकात भारताची बिनबाद 1 धाव झाली आहे.

  • 04 Mar 2022 09:20 AM (IST)

    विराटला BCCI ने केलं सन्मानित

    100 व्या कसोटीआधी विराट कोहलीला बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आलं. हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटच कौतुक करताना त्याला मानचिन्ह प्रदान केलं. विराटने देखील सर्वांचे आभार मानले. यावेळी पत्नी अनुष्का शर्मा सुद्धा विराटसोबत मैदानावर उपस्थित होती.

  • 04 Mar 2022 09:07 AM (IST)

    पहिल्या कसोटीसाठी असा आहे संघ

  • 04 Mar 2022 09:05 AM (IST)

    भारताने टॉस जिंकला

    श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिकंला आहे. रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना आहे, तर रोहित शर्मा टेस्ट कॅप्टन म्हणून आज डेब्यू करत आहे.

  • 04 Mar 2022 08:57 AM (IST)

    मोहालीमध्ये भारताचा रेकॉर्ड

    भारत आणि श्रीलंकेमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. भारताने आतापर्यंत मोहालीमध्ये 13 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात सात कसोटी सामन्यात विजय मिळवलाय तर एक कसोटी गमावली आहे. पाच कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत.