मोहाली: टी-20 सीरीज प्रमाणे कसोटी मालिकेवरही (Test Series) भारताचं वर्चस्व कायम आहे. मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्याचा (Mohali Test) अवघ्या तीन दिवसात निकाल लागला. भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला रवींद्र जाडेजा. (Ravindra jadeja) रवींद् जाडेजाच्या ऑलराऊंडर खेळाच्या बळावर भारताने या विजयाची नोंद केली. रवींद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोशिएशच्या हळूहळू फिरकीला अनुकूल होत जाणाऱ्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. आज कसोटीच्या तिसऱ्यादिवशी कालच्या चार बाद 108 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 174 धावात ऑलआऊट झाला. श्रीलंकेच्या उर्वरित सहा फलंदाजांनी फक्त 66 धावांची भर घातली.
भारताने श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला आहे. भारताकडे मालिकेत 1-0 अशी आघाडी आहे.
भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने पहिल्याडावात नाबाद 175 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर खेळताना कुठल्याही भारतीय फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेचा दुसरा डाव 178 धावात आटोपला.
1ST Test. WICKET! 59.6: Lahiru Kumara 4(14) ct Mohammad Shami b Ravichandran Ashwin, Sri Lanka 178/10 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022
भारताने श्रीलंकेला नववा धक्का दिला आहे. विश्वा फर्नांडोला भोपळाही फोडू न देता मोहम्मद शमीने पायचीत पकडलं. श्रीलंकेची अवस्था नऊ बाद 170 आहे.
भारताने श्रीलंकेला आठवा धक्का दिला आहे. लासिथ एमबुलडेनियाला 2 धावांवर जाडेजाने ऋषभ पंतकरवी झेलबाद केले.
1ST Test. WICKET! 50.6: Lasith Embuldeniya 2(42) ct Rishabh Pant b Ravindra Jadeja, Sri Lanka 153/8 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022
श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत आहे. त्याच्या सातबाद 130 धावा झाल्या आहेत. भारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादला आहे. अजूनही ते 270 धावांनी पिछाडीवर आहेत.
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या चार बाद 120 धावा झाल्या आहेत. मॅथ्यूज 27 आणि चरिथ असलंका 20 धावांवर खेळतोय.
मॅथ्यूज आणि डिसिलिव्हाने श्रीलंकेचा डाव सावरला आहे. श्रीलंकेच्या तीन बाद 92 धावा झाल्या आहेत. मॅथ्यूज 21 आणि डिसिलिव्हा 28 धावांवर खेळतोय.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कर्णधार दिमुथ करुणारत्नेला आऊट केलं आहे. करुणारत्नेला विकेटकीपर पंतकरवी झेलबाद केले. करुणारत्ने 27 धावांवर आऊट झाला. श्रीलंकेच्या तीन बाद 59 धावा झाल्या आहेत.
1ST Test. 17.2: Mohammad Shami to Dhananjaya de Silva 4 runs, Sri Lanka 57/3 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022
लंचनंतर खेळाला सुरुवात झाली आहे. भारताने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला आहे. पाथुम निसांकाला 6 धावांवर अश्विनने पंतकरवी झेलबाद केलं.
1ST Test. WICKET! 6.5: Pathum Nissanka 6(19) ct Rishabh Pant b Ravichandran Ashwin, Sri Lanka 19/2 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022
एमआयटी महाविद्यालयात थोड्याच मोदी होणार दाखल
एमआयटी महाविद्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त
मोठ्या संख्येने गर्दी
पुण्यातले अनेक विद्यार्थीसोबत
भाजपाचे अनेक नेते सुध्दा दाखल
तिसऱ्या दिवसात पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. लंचपर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्याडावात एक विकेट गमावून 10 धावा झाल्या आहेत. अजूनही श्रीलंकेचा संघ 390 धावांनी पिछाडीवर आहे. दिमुथ करुणारत्ने आणि पाथुम निसांकाची जोडी मैदानात आहे.
Early breakthrough for #TeamIndia ?@ashwinravi99 gets the wicket of Dimuth Karunaratne.
Follow the match ▶️ https://t.co/XaUgOQVg3O#INDvSL | @Paytm pic.twitter.com/Zht419mfvr
— BCCI (@BCCI) March 6, 2022
श्रीलंका भारतापेक्षा अजून 400 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने फॉलोऑन दिला आहे. श्रीलंकेचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. डावाने सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
1ST Test. 1.0: Mohammad Shami to Dimuth Karunaratne 4 runs, Sri Lanka 5/0 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022
आज सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. कालच्या चार बाद 108 वरुन पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेचा डाव 174 धावात आटोपला. रवींद्र जाडेजाने भारताकडून सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. सबकुछ रवींद्र जाडेजा असंच म्हणाव लागेल. कारण पहिल्या डावात त्याने नाबाद 175 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा संघ तब्बल 400 धावांनी पिछाडीवर आहे.
A 5⃣-wicket haul for @imjadeja as #TeamIndia wrap Sri Lanka innings for 174 ??
Follow the match ▶️ https://t.co/XaUgOQVg3O#INDvSL | @Paytm pic.twitter.com/iJoGxRr6cY
— BCCI (@BCCI) March 6, 2022
श्रीलंकेचा डाव गडगडला आहे. आधी जसप्रीत बुमराह त्यानंतर रवींद्र जाडेजाने श्रीलंकन संघाला हादरे दिले आहेत. डीकवेला आणि लकमलला जाडेजाने आऊट केलं. श्रीलंकेची अवस्था सात बाद 173 झाली आहे.
#TeamIndia are on a roll here in Mohali! ? ?
A double-wicket over from @imjadeja. ? ?
Sri Lanka 7⃣ down!
Follow the match ▶️ https://t.co/XaUgOQVg3O#INDvSL | @Paytm pic.twitter.com/8zLBElbJMK
— BCCI (@BCCI) March 6, 2022
भारताने श्रीलंकेला पाचवा धक्का दिला आहे. 29 धावांवर खेळणाऱ्या चरिथ असलंकाला जसप्रीत बुमराहने पायचीत पकडलं. श्रीलंकेच्या पाचबाद 161 धावा झाल्या आहेत.
1ST Test. WICKET! 57.6: Charith Asalanka 29(64) lbw Jasprit Bumrah, Sri Lanka 161/5 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022
पाथुम निसांका आणि चरिथ असलंका चांगली फलंदाजी करत आहेत. श्रीलंकेच्या चारबाद 161 धावा झाल्या आहेत. निसांकाने अर्धशतक झळकावलं आहे. असालंका 29 धावांवर खेळतोय.
श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाली आहे. पाथुन निसांका (26) आणि चरिथ असलंका (2) ही जोडी मैदानात आहे.
Huddle Talk ✅
We are inching closer to the LIVE action ? ?#TeamIndia | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/ULA56KgYLK
— BCCI (@BCCI) March 6, 2022
रविचंद्रन अश्विन भारताचा महान गोलंदाज कपिल देव यांचा रेकॉर्ड तोडण्याच्या नजीक आहे. कपिलने कसोटीत सर्वाधिक 434 विकेट घेतल्या होत्या. अश्विनने आतापर्यंत 432 विकेट घेतल्या आहेत. आज तिसऱ्यादिवशी अश्विन कपिल देव यांचा विक्रम मोडू शकतो.