मुंबई: BCCI च्या निवड समितीने काल श्रीलंकेविरुद्धच्या T20 आणि वनडे सीरीजसाठी टीम जाहीर केली. श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजने टीम इंडिया नवीन वर्षाचा शुभारंभ करणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच या सीरीजला सुरुवात होईल. निवड समितीने काल संघ निवड करताना काही प्रस्थापित खेळाडूंना धक्के दिलेत. त्यामुळे त्यावरुन आता उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवानंतर टी 20 मध्ये मोठे बदल अपेक्षित होते. संघ निवड सुद्धा तशीच झाली आहे.
हे पूर्णपणे अनपेक्षित
ऋषभ पंतला टीम इंडियातून डच्चू मिळालाय. त्याला टी 20 आणि वनडे दोन्ही टीममधून ड्रॉप करण्यात आलय. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांना विश्रांती देण्यात आलीय. पण पंतच दोन्ही टीममधून वगळणं पूर्णपणे अनपेक्षित आहे.
NCA मध्ये का पाठवलं?
ऋषभ पंत आधीपासूनच डेंजर झोनमध्ये होता. वर्ष 2022 मध्ये त्याने वनडे आणि टी 20 दोन्ही फॉर्मेटमध्ये चमकदार कामगिरी केली नाही. खराब प्रदर्शनामुळे ऋषभला वगळल्याची चर्चा आहे. पण ऋषभला गुडघ्यावरील उपचारासाठी रिहॅब प्रोसेससाठी दोन आठवडे NCA मध्ये जाण्यास सांगितलय. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
कधी आहे ते सेशन?
पंतला गुडघे दुखापतीचा त्रास सुरु आहे. त्यावर उपचारांसाठी पंतला फिजिकल ट्रेनिंगची आवश्यकता आहे. त्याला काही व्यायाम प्रकार सांगितले जातील. त्यासाठी त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणं गरजेचं होतं. विकेटकीपरला सतत वाकावं लागतं. बीसीसीआयच्या मेडीकल टीमने ऋषभसाठी स्ट्रेंथनिंग आणि कंडीशनिंग सेशनची शिफारस केली होती. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. 3 ते 15 जानेवारी दरम्यान स्ट्रेंथनिंग आणि कंडीशनिंग सेशन आहे. त्यामुळे त्याची निवड करण्यात आलेली नाही.