पुणे: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये 3 टी 20 सामन्याची सीरीज सुरु आहे. सध्या श्रीलंका या सीरीजमध्ये 1-0 ने पिछाडीवर आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना झााल. या मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 2 धावांनी विजय मिळवला. आज पुण्यात दुसरा सामना होणार आहे. श्रीलंकेने हा सामना गमावला, तर ते सीरीज हरतील. श्रीलंकेच्या कॅप्टनने विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक धावा
दसुन शनाका फक्त श्रीलंकन टीमचा कॅप्टन नाहीय, तर तो कमालीचा ऑलराऊंडरही आहे. विशेष म्हणजे टीम इंडिया विरुद्ध T20 सामन्यामध्ये खेळायला त्याला विशेष आवडतं. 2021 पासून T20 मध्ये शनाकाने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.
भारतापेक्षा ‘या’ टीमविरुद्ध जास्त चांगला स्ट्राइक रेट
शनाका 2021 पासून आतापर्यंत 11 टीम्स विरुद्ध T20 सामने खेळलाय. त्याची सर्वाधिक सरासरी आणि धावा टीम इंडिया विरुद्ध आहेत. टीम इंडिया विरुद्ध त्याचा दुसरा बेस्ट स्ट्राइक रेट आहे. भारतापेक्षा वेस्ट इंडिज विरुद्ध त्याचा जास्त चांगला स्ट्राइक रेट आहे.
भारताविरुद्ध ठोकल्या इतक्या धावा
शनाकाने T20 मध्ये भारताविरुद्ध 171.2 च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत 202 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 67.33 आहे. भारताविरुद्ध हाच जलवा कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. जेणेकरुन श्रीलंकेचा विजय सुनिश्चिच होईल.
पराभवानंतर शनाका काय म्हणाला?
श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाने पहिली टी 20 गमावल्यानंतर सीरीजमध्ये बाऊन्सबँक करण्याचा विश्वास व्यक्त केलाय. टीमकडे अनेक प्रतिभावाना खेळाडू आहेत. टीम पराभवातून विजयाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी सक्षम आहे. मुंबईमध्ये त्याने हे विधान केलं. आता पुण्यात तो कसं प्रदर्शन करतो, त्याची उत्सुक्ता आहे.