मुंबई: दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला. या मॅच मध्ये पाकिस्तानने भारतावर पाच विकेट राखून विजय मिळवला. या हायव्होल्टेज सामन्यानंतर दुसऱ्यादिवशी सोमवारी टीम इंडियाचं सराव सत्र आयोजित करण्यात आलं होतं. भारताचा मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध सामना होईल. त्याआधी हे प्रॅक्टिस सेशन आयोजित करण्यात आलं होतं. हे सराव सत्र ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक होतं. ऐच्छिक सराव सत्र असल्यामुळे विराट कोहलीने दांडी मारली. दोन सामने 48 तासात होत आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने ऐच्छिक प्रॅक्टिस सेशन ठेवलं होतं.
विराट सराव सत्राला दांडी मारुन डॉक्टर मंजरी राव यांच्या क्लिनिक मध्ये गेला होता. डॉ. मंजरी राव या दुबईतील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आहेत. एमिरॅटस युरोपियन मेडिकल सेंटर मध्ये त्या प्रॅक्टिस करतात. क्लिनिक मधील विराट कोहली सोबतचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे.
विराट कोहली होमिओपॅथीच्या क्लिनिक मध्ये का गेला होता? त्यामागे काय कारण आहे? ते स्पष्ट झालेलं नाही. टीम इंडिया दुबईत बायो-बबल मध्ये नाहीय. खेळाडूंना फिरण्याचं स्वातंत्र्य आहे.
रविवारी सुपर 4 राऊंड मध्ये विराट कोहलीने फॉर्म मध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. त्याने 44 चेंडूत 60 धावा फटकावल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्स मध्ये 181/7 धावा केल्या. विराट कोहलीच्या फलंदाजीमुळे भारताला या धावसंख्येपर्यंत पोहोचता आले. या मॅच मध्ये मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाजच्या दमदार फलंदाजीमुळे पाकिस्तानने सामना जिंकला.
@imVkohli Visited Homeopathy Clinic In Dubai Today ?#ViratKohli #Homeopathy pic.twitter.com/1MuldqEC28
— virat_kohli_18_club (@KohliSensation) September 5, 2022
टी 20 वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीचं फॉर्म मध्ये येणं, टीम इंडियासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. सलामीवीर केएल राहुलने सुद्धा चांगला खेळ दाखवला. भारताने सामना गमावला. पण काही चांगल्या, सकारात्मक गोष्टी सुद्धा या मॅच मध्ये घडल्या. पाकिस्तान विरुद्धची खेळी नक्कीच विराट कोहलीला मोठा आत्मविश्वास देऊन गेली असेल.