मुंबई: ‘हमसे दिल लगाया क्यों, जब ये दिल तोड़ना ही था’ जसप्रीत बुमराहची सध्याची स्थिती अशीच काहीशी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी सिलेक्टर्सनी जसप्रीत बुमराहचा टीममध्ये समावेश केला. पण क्रिकेट सामन्याच्या एकदिवसआधी क्रिकेटप्रेमींना अचाकन हैराण करुन सोडणारी बातमी मिळाली. या बातमीमुळे जसप्रीत बुमराहचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता प्रश्न हा निर्माण होतोय की, खेळवायच नव्हतं, मग जसप्रीत बुमराहचा टीममध्ये समावेश का केला?.
फक्त एकटा बुमराह नाहीय
क्रिकबजने सूत्रांच्या हवाल्याने बुमराहबद्दल अपडेट दिलीय. सध्या जसप्रीत बुमराह गुवहाटीमध्ये नाहीय. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये खेळणारे सर्व खेळाडू गुवहाटीमध्ये पोहोचलेत. फक्त त्यांच्यामध्ये जसप्रीत बुमराह नाहीय. बीसीसीआयने 3 जानेवारीला प्रेस रिलीज जारी केली. त्यात जसप्रीत बुमराहचा वनडे टीममध्ये समावेश केल्याची माहिती दिली.
बीसीसीआयने काय सांगितलेलं?
नॅशनल क्रिकेट अकादमीने जसप्रीत बुमराहला फिट घोषित केलय, असं बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने बुमराहची निवड करताना सांगितलं होतं. पण भारतीय टीममधील खेळाडू पहिल्या वनडेसाठी गुवहाटीमध्ये पोहोचले, त्यावेळी त्यांच्यामध्ये बुमराह नव्हता. सूत्रांनी त्याच मुद्याकडे लक्ष वेधलय.
जसप्रीत बुमराहने अचानक वनडे टीममधून नाव मागे का घेतलं? NCA मधूनच सल्ला देण्यात आलाय. त्यावर हा निर्णय घेण्यात आला. भारताला पुढे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीज आणि वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. तेच लक्षात घेऊन जसप्रीत बुमराहच्या बाबतीत कुठलीही घाई करायची नाही, असं ठरलय.