Yashasvi Jaiswal | पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वालने जिंकलं, त्याचा एक कडक रिव्हर्स स्वीप पाहून अश्विन म्हणाला…..

| Updated on: Jul 13, 2023 | 8:46 AM

Yashasvi Jaiswal | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी जैस्वालने डेब्यु केलाय. वेस्ट इंडिज विरुद्ध तो पहिला कसोटी सामना खेळतोय. पहिल्याच दिवशी यशस्वीने कमालाची परफॉर्मन्स दाखवला. त्याने भविष्याबद्दल बऱ्याच अपेक्षा जागवल्या आहेत.

Yashasvi Jaiswal | पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वालने जिंकलं, त्याचा एक कडक रिव्हर्स स्वीप पाहून अश्विन म्हणाला.....
Yashasvi Jaiswal
Image Credit source: twitter
Follow us on

रोसेऊ : यशस्वी जैस्वालमध्ये क्षमता आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा जबरदस्त परफॉर्मन्स सर्वांनी पाहिलाय. आता जागतिक क्रिकेट विश्वाला तो आपली क्षमता दाखवून देतोय. वेस्ट इंडिज विरुद्ध डॉमिनिका टेस्टमध्ये यशस्वी जैस्वालने डेब्यु केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वीने शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या टेस्टमध्ये यशस्वीने रिव्हर्स स्वीपचा एक फटका खेळला. तो पाहिल्यानंतर अश्विनने एकप्रकारे त्याच्या करीयरचा फैसला करुन टाकलाय. भारतीय ऑफस्पिनर यशस्वीबद्दल मोठी गोष्ट बोलला.

टेस्ट क्रिकेटच्या पीचवर डेब्यु करताना यशस्वी जैस्वाल सुरुवातीला थोडा नव्हर्स होता. पण एकदा नजर बसल्यानंतर त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू पोहोचवला. टीम इंडियाच्या इनिंगच्या अखेरच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर यशस्वी दिवसातील सर्वोत्तम फटका खेळला.

यशस्वीने त्याचं टॅलेंट दाखवलं

यशस्वी रिव्हर्स स्वीपचा शॉट खेळला. त्याने पॉइंट रीजनमध्ये चौकार वसूल केला. या शॉटमधून यशस्वीची क्षमता दिसून आली. या फटक्यावर त्याचं कमालीच नियंत्रण होतं. टेस्टमध्ये डेब्यु करणाऱ्या फलंदाजासाठी असा फटका खेळणं सोपं नसतं. पण यशस्वीने त्याचं टॅलेंट दाखवून दिलं.

अश्विन काय म्हणाला?

यशस्वीच्या बॅटमधून निघालेला हा शॉट पाहून अश्विनने त्याच्या भविष्याबद्दल भाष्य केलं. तुम्ही यशस्वीकडून अजून काय अपेक्षा करु शकता? त्याने दिवसातील अखेरच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर जो फटका मारला, तो कमालीचा होता. तो टीम इंडियाकडून दीर्घकाळ खेळेल, आपल्या करीयरमध्ये पुढे जाईल अशी अपेक्षा आहे.

पहिल्यादिवशी यशस्वीने किती चौकार मारले?

डॉमिनिका टेस्ट मॅचमध्ये पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वालने नाबाद 40 धावा केल्या आहेत. त्याने 73 चेंडूंचा सामना केला. यशस्वीने या खेळीत 6 चौकार मारले. त्याने कॅप्टन रोहित शर्मासोबत नाबाद 80 धावांची भागीदारी सुद्धा केली.