India vs West Indies, 3rd ODI: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 96 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजांमुळे विजय शक्य झाला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वेस्ट इंडिजला दबावाखाली ठेवलं. वेस्ट इंडिजकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. खालच्या फळीतील ओडियन स्मिथने (Odean smith) वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 18 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने जोरदार फटकेबाजी करताना तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. स्मिथची फटकेबाजी तशी काही उपयोगाची नव्हती, कारण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. वेस्ट इंडिजच्या सात विकेट गेल्या होत्या व लक्ष्य देखील खूप मोठे होते.