नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Ind Vs WI) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतानं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा प्रकारे भारतानं मालिकेवरही कब्जा केला आहे. भारतीय संघानं (Indian cricket team) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 चेंडू राखून 2 गडी राखून पराभव केला. क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटमध्ये यजमान वेस्ट इंडिजचा हा सलग 8वा पराभव आहे. याआधी , टीम इंडियानं शेवटची वनडे 3 धावांच्या थोड्या फरकानं जिंकली होती. वेस्ट इंडिजविरुद्धची (WI) मालिकाही जिंकून भारतानं आपल्या बेंच स्ट्रेंथची ताकद दाखवून दिली आहे. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजनं भारतासमोर 312 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य 2 चेंडू आधीच 8 विकेट्सनं पूर्ण केलं आहे. अशाप्रकारे वेस्ट इंडिजनं केवळ ही मालिका गमावली नाही तर 2019 च्या विश्वचषकानंतर प्रथम फलंदाजी करताना सामने गमावण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब झाला आहे.
2ND ODI. India Won by 2 Wicket(s) https://t.co/d4GVR1DJNi #WIvIND
— BCCI (@BCCI) July 24, 2022
.@akshar2026 played a sensational knock & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat West Indies in the 2nd ODI to take an unassailable lead in the series. ? ? #WIvIND
Scorecard▶️ https://t.co/EbX5JUciYM pic.twitter.com/4U9Ugah7vL
— BCCI (@BCCI) July 24, 2022
विजयासाठी 312 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं शेवटच्या 10 षटकांत केवळ 100 धावा केल्या. 2001 नंतर शेवटच्या 10 षटकांमध्ये धावांचा पाठलाग करताना ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. या वेगवान खेळाचा परिणाम म्हणजे भारतीय संघाला पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर धडक मारता आली.
भारताकडून श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी संघाचा पाया रचण्याचं काम केलं. मात्र फॉर्ममध्ये पुनरागमन करणाऱ्या अक्षर पटेलनं जोरदार धमाका केला. त्याने ती 35 चेंडूत स्फोटक खेळी खेळली. यामुळे टीम इंडियाला विजय मिळवून दिला. डावखुरा अक्षर पटेलनं 5 षटकार आणि 3 चौकारांसह 64 धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून देऊनच तो परतला. या अतुलनीय खेळीसाठी तो सामनावीर म्हणून निवडला गेला.
.@akshar2026 slammed a stunning 6⃣4⃣* off just 3⃣5⃣ balls & was our top performer from the second innings of the second #WIvIND ODI. ? ? #TeamIndia
Here’s a summary of his knock ? pic.twitter.com/eH2XKgqQ27
— BCCI (@BCCI) July 24, 2022
श्रेयस-संजूनेही अर्धशतक झळकावलं आणि विंडीज संघानं 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपनं कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने कर्णधारपदी 74 धावांची खेळी खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि आवेश खान विकेट घेण्यात अपयशी ठरले.
आवेशचा हा डेब्यू वनडे होता आणि तो चांगलाच महागात पडला. त्यानं 6 षटकात 54 धावा दिल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं 49.4 षटकांत 8 गडी गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर (63), संजू सॅमसन (54) आणि शुभमन गिलने 43 धावा केल्या.