मुंबई: एकवेळ शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतीय फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ होता. पण सध्या तो फक्त एका फॉर्मेट पुरता मर्यादीत राहिला आहे. शिखर धवन सध्या फक्त 50 षटकांच्या क्रिकेट मध्ये खेळतो. त्यामुळे मागच्या काही महिन्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसं क्रिकेट खेळताना दिसलेला नाही. ऑस्ट्रेलियाता होणार आगामी टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) लक्षात घेता BCCI ने जास्तीत जास्त टी 20 मालिकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. शिखर धवन टी 20 संघाचा भाग नाहीय. त्यामुळे तो फक्त वनडे संघात दिसला आहे. आता शिखर धवनच्या फलंदाजीच्या स्टाइल, पद्धतीवरुन वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इंग्लंड विरुद्धच्या तीन वनडे सामन्यात शिखर संघर्ष करताना दिसला. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या वनडेत तो फॉर्म मध्ये परतला. त्याने 97 धावांची खेळी केली. पण शिखर धवनची फलंदाजीची पद्धत आहे, त्यावरुन मतभेद आहेत. शिखर धवन खेळपट्टीवर आल्यानंतर आधी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतो. खेळपट्टिवर टिकून फलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
पण कॅप्टन रोहित शर्मा, टीम इंडियाने आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळावे या मताचा आहे. शिखर धवनची फलंदाजीची ही पद्धत नजरेतून सुटलेली नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर 2023 मध्ये होणारी 50 षटकांची वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेऊन, निवड समितीचे सदस्य धवन बरोबर त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करणार आहेत. इनसाइट स्पोर्ट्ने हे वृत्त दिलं आहे.
“शिखर आणि रोहित मध्ये कुठलाही वाद नाहीय. फक्त दोघांच्या वेगळ्या कल्पना आहेत. ही वाईट गोष्ट नाही. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर आम्ही शिखर धवन सोबत त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करु. त्याला त्याच्या फलंदाजीच्या स्टाइल मध्ये बदल करायची गरज असेल, तर विक्रम आणि राहुल तिथे आहेत. ते त्याच्याबरोबर बोलतील. आम्ही हस्तक्षेप करणार नाही” असं निवड समितीच्या सदस्याने सांगितलं.
शिखर धवन सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज तिसरा वनडे सामना असून भारताला मालिकेत क्लीन स्वीपची संधी आहे.