मुंबई: भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सीरीज मधला पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये भारताचा पराभव झाला. पुन्हा तिसरा सामना भारताने 7 विकेटने जिंकला. या विजया दरम्यान कॅप्टन रोहित शर्माला दुखापत झाली. रोहितच्या मागे कंबरेच दुखण लागलं. त्यानंतर त्याचा फिटनेस आणि पुढच्या काही सामन्यात उपलब्धतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता त्याच्या फिटनेसद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान रोहितला कंबर दुखीचा जो त्रास झाला होता, तो गंभीर नाहीय. रोहित शर्मा आता त्यातून सावरला आहे. 6 ऑगस्टला होणाऱ्या टी 20 सामन्यात तो खेळताना दिसेल. अजूनही रोहितकडे आरामासाठी दोन दिवस आहेत. त्यामुळे रोहित सहजपणे पुढचा सामना खेळू शकतो. 7 ऑगस्टला वेस्ट इंडिज विरुद्ध पाचवा टी 20 सामना होणार आहे. हे दोन्ही सामने अमेरिकेत फ्लोरिडा मध्ये खेळले जाणार आहेत. कंबरेची दुखापत फारशी गंभीर नसल्याचं रोहितने तिसऱ्या टी 20 सामन्यानंतर सांगितलं होतं.
रोहित फिट असला, तरी त्याला चौथ्या टी 20 सामन्यासाठी आराम देण्याचा निर्णय होऊ शकतो. मागच्या काही वर्षात रोहित अनेकदा दुखापतग्रस्त झाला आहे. खासकरुन लोअर बॉडी मध्ये त्याला अनेकदा दुखापत झालीय. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सुद्धा त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. न्यूझीलंड विरुद्धही त्याला दुखापत झाली होती. लवकर पुनरागमन करण्याच्या नादात त्याला आणखी मोठी दुखापत होऊ शकते.
भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या टी 20 सामन्यात रोहितने आराम केला, तरी फरक पडणार नाही. संघाच नेतृत्व करण्यासाठी भारताकडे पर्यायही उपलब्ध आहेत. रोहितला विश्रांती दिली, तर आणखी एका युवा खेळाडूची चाचणी करता येईल. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते? ते आता पहाव लागेल.