मुंबई : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. येत्या 12 जुलैपासून टेस्ट सीरीजने या टूरची सुरुवात होणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी, वनडे आणि 5 T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या मालिकेत 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 T20 सामने आहेत. 12 जुलै ते 13 ऑगस्ट असा टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा आहे. टीम इंडियाने या सीरीजसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या IPL 2023 गाजवणाऱ्या खेळाडूंना टेस्ट टीममध्ये संधी मिळालीय.
चेतेश्वर पुजारासारख्या अनुभवी खेळाडूला टीममधून ड्रॉप करण्यात आलय. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या तीन युवा चेहऱ्यांच्या कामगिरीवर लक्ष असेल. कारण त्यांच्याकडे टीम इंडियाच भविष्य म्हणून पाहिलं जातय.
कुठे पाहता येणार सामने?
दरम्यान या सीरीज संदर्भात भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सामन्याचे कुठल्याही नावाजलेल्या स्पोर्ट्स चॅनलवर प्रक्षेपण होणार नाहीय. फॅनकोड या OTT App वर तुम्ही सामन्यांच लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. जिओ सिनेमा आणि फॅन कोडमधील डील फिस्कटली आहे. स्पोर्ट्स चॅनलवर हे सामने दिसणार नसेल, तरी भारतात दूरदर्शनवर हे सामने पाहता येतील. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय.
कुठल्या चॅनलवर तुम्ही सामने पाहू शकता?
दूरदर्शनच मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडे आपल्या भाषेत सामने पाहण्याचा पर्याय असेल. T20 आणि वनडे सामन्यांच हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, बांग्ला आणि कन्नड भाषेत प्रक्षेपण होईल. टेस्ट डीडी स्पोर्ट्सवर प्रक्षेपित होईल. डीडी सप्तगिरी, डीडी यादगिरी, डीडी बांग्ला आणि डीडी चंदना या वाहिन्यांवर वनडे आणि टी 20 सामने पाहता येतील. टेस्ट मॅच डीडी स्पोर्ट्सवर तुम्ही पाहू शकता. डीडी स्पोर्ट्सवर कॉमेंट्री हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये असेल. दूरदर्शनच नेटवर्क लक्षात घेता, 16 कोटीच्या आसपासून प्रेक्षकवर्ग या सीरीजला मिळू शकतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यापासून नव्याने WTC सायकलची सुरुवात करणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप लक्षात घेता टीम इंडियासाठी वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे सीरीजही महत्वाची आहे. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कपमधून आधीच आऊट झाली आहे. क्वालिफायर्समध्ये पराभव झाल्यामुळे वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही.