नवी दिल्ली : येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. पहिला कसोटी डॉमिनिका येथे खेळला जाईल. वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? याची उत्सुक्ता आहे. कारण या सीरीजमध्ये चेतेश्वर पुजाराला टीममधून ड्रॉप करण्यात आलं आहे. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड दोघांना टेस्ट टीममध्ये स्थान मिळालय. या दोघांपैकी डेब्युची संधी कोणाला मिळणार? याची उत्सुक्ता आहे. दोघेही ओपनर आहेत.
यशस्वी जैस्वाल टीम इंडियाकडून वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये डेब्यु करणार हे जवळपास निश्चित आहे. दोन दिवसाच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये यशस्वीने वनडे स्टाइल बॅटिंग केली. 54 धावा फटकावल्या.
ओपनिंगला कोण?
टीम इंडियाला नव्याने कसोटी संघाची उभारणी करायची आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वालला टीममध्ये स्थान मिळणं जवळपास निश्चित आहे. यशस्वी टेस्टमध्ये चेतेश्वरच्या जागी नंबर 3 वर फलंदाजीसाठी उतरु शकतो. सलामीला रोहित शर्मासोबत शुबमन गिलच येईल. सध्या शुबमन गिल सर्व फॉर्मेटमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंग करतो.
अन्याय नाही होणार
अंडर-19 क्रिकेटमध्ये शुबमन गिलने नंबर 3 आणि त्यापेक्षा खालच्या नंबवर बॅटिंग केली आहे. इंडिया ए कडून खेळताना त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध नंबर 4 वर येऊन डबल सेंच्युरी झळकवली होती. टेस्टमध्ये शुबमनने ओपनर म्हणून सुरुवात केली होती. त्यामुळे त्याला नंबर 3 वर पाठवण योग्य होणार नाही.
नंबर 3 च का?
यशस्वी जैस्वाल नंबर 3 वर बॅटिंग करेल. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चौथ्या-पाचव्या नंबरवर बॅटिंगला येतील. यशस्वी जैस्वाल ओपनर आहे. पण सिलेक्टर्स दीर्घकालीन योजनेच्या दृष्टीने त्याला नंबर 3 च्या पोजिशनवर बघतायत.
यशस्वी जैस्वालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात केली आहे. 15 सामन्यात त्याने 80.21 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये त्याने 600 धावा केल्या आहेत. सराव सामन्यात यशस्वीने धावा केल्या. त्याचवेळी कोहली आणि रहाणेने संधी गमावली. कोहली जयदेव उनाडकटच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर स्पर्श करुन आऊट झाला. रहाणे सुद्धा चमक दाखवू शकला नाही.